शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भाजपला सत्तेचा आत्मविश्वास, पण नवीन समीकरणाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST

परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता सर्वाधिक २६ सदस्य भाजपचे असल्याने त्यांना सत्तेचे प्रबळ दावेदार मानले जाते. मात्र, त्यांचे समीकरण अपक्षांवर अवलंबून आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी, अपक्ष हे एकत्र आल्यास सत्तेचे समीकरण जुळून येऊ शकते. सध्या त्यादृष्टीने हालचालीसुद्धा जोरात सुरू आहेत. या निवडणुकीत काहीही होण्याची शक्यता आहे. तर भाजपमधील एक आठ सदस्यांचा गट निवडणुकीदरम्यान बाहेर पडल्यास आश्चर्य वाटू नये, अशी शक्यतासुद्धा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक तीन दिवसांवर आली असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा आत्मविश्वास आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अपक्ष सदस्यांनीसुद्धा एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीला घेऊन दोन दिवसात पुन्हा नवीन व्टिस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच जिल्हा परिषदेत नवीन समीकरणाचे संकेत दिले जात आहेत. जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. यात आठपैकी पाच पंचायत समितींवर भाजपने वर्चस्व मिळवले. तर काँग्रेस एक, वंचित एक आणि गोंदिया पंचायतीवर चाबीने सत्ता स्थापन केली. या निवडणुकीने जिल्हा परिषद निवडणुकीचे बरेचसे चित्र स्पष्ट केले. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी १० मे रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता सर्वाधिक २६ सदस्य भाजपचे असल्याने त्यांना सत्तेचे प्रबळ दावेदार मानले जाते. मात्र, त्यांचे समीकरण अपक्षांवर अवलंबून आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी, अपक्ष हे एकत्र आल्यास सत्तेचे समीकरण जुळून येऊ शकते. सध्या त्यादृष्टीने हालचालीसुद्धा जोरात सुरू आहेत. या निवडणुकीत काहीही होण्याची शक्यता आहे. तर भाजपमधील एक आठ सदस्यांचा गट निवडणुकीदरम्यान बाहेर पडल्यास आश्चर्य वाटू नये, अशी शक्यतासुद्धा आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सदस्यांमध्ये फूट पडू नये, याची काळजी घेत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीन पक्षांचे ओठात एक अन् पोटात एक असे धोरण असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत बरेच वेगळे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

भाजप सदस्यांचा तीन दिवसांपासून हैद्राबाद येथे मुक्काम - जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीदरम्यान आपल्याच पक्षातील सदस्य फुटू नये, यासाठी भाजपकडून विशेष काळजी घेतली जाते. यासाठी तीन दिवसांपूर्वीच भाजपच्या सर्व सदस्यांना हैद्राबाद येथे पर्यटनासाठी नेण्यात आले आहे. हे सर्व सदस्य ९ मे रोजी गोंदियात दाखल होणार आहे. या सदस्यांसोबत दोन अपक्ष सदस्यदेखील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

गोंदियातील निवडणुकीचे भंडाऱ्यात उमटणार पडसाद - गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक एकाच दिवशी होणार आहे. गोंदिया जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या समीकरणावर भंडारा जिल्हा परिषदेचे बरेचसे समीकरण अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील पक्षाचे प्रमुख नेते या निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी एकमेकांचे विरोधक असलेले वेळ पडल्यास सत्तेसाठी एकत्र येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. 

सत्तेसाठी नेत्याच्या पुत्राची धडपड - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी व अध्यक्ष आपल्या मर्जीतील असावा, यासाठी एका नेत्याच्या पुत्राने सर्व सूत्रं आपल्या हाती घेतल्याची चर्चा आहे. अध्यक्ष आमचा बाकी सर्व पदे तुम्हाला, पण सत्तेसाठी आमच्यासोबत या, अशी ऑफरसुद्धा या नेत्याच्या पुत्राने एका पक्षाच्या नेत्याला दिल्याची माहिती आहे. मात्र, जुना हिशोब चुकता करण्याची ही नामी संधी त्या नेत्याकडे चालून आल्याने त्यांनीसुद्धा ही ऑफर फेटाळल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस