‘शिवार’ पुरवणीचे थाटात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 01:56 IST2016-02-22T01:56:07+5:302016-02-22T01:56:07+5:30

लोकमत वृत्तपत्राच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘शिवार’ पुरवणीच्या सालेकसा आवृत्तीचे ...

Thaet Publications of 'Shivar' Supari | ‘शिवार’ पुरवणीचे थाटात प्रकाशन

‘शिवार’ पुरवणीचे थाटात प्रकाशन

‘लोकमत’चा नाविण्यपूर्ण उपक्रम : अनेक मान्यवरांची उपस्थिती
सालेकसा : लोकमत वृत्तपत्राच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘शिवार’ पुरवणीच्या सालेकसा आवृत्तीचे प्रकाशन राज्याची सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते, आ. संजय पुराम, आ. राजू तोडसाम, राजे वासुदेव शाह टेकाम, राकेश शर्मा, तहसीलदार प्रशांत सांगळे, बाबा लिल्हारे, प्रकल्प अधिकारी मिनाक्षी उन्हाळे, समितीचे सदस्य दुर्गाप्रसाद कोकोडे, शंकर मडावी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
‘एक पाऊल विकासाकडे’ या शिर्षकांतर्गत काढण्यात आलेल्या पुरवणीचे मुखपृष्ठ बघून सर्वांनी या पुरवणीचे कौतूक केले. तर नामदार बडोले यांच्यासह खासदार नेते, आमदार पुराम यांनी पुरवणीचे प्रकाशन झाल्याचे जाहीर केले.
प्रकाशन सोहळ््याला जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती देवराज वडगाये, भाजप तालुकाध्यक्ष परसराम फुंडे, राजेंद्र बडोले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, लोकमतचे तालुका प्रतिनिधी विजय मानकर यांच्यासह तालुक्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी, वृत्तपत्रांचे वार्ताहर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Thaet Publications of 'Shivar' Supari