अर्जुनी-मोरगावात तहसीलदारांचे बनावट सही शिक्के?

By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:05+5:302016-04-03T03:51:05+5:30

गेल्या कित्येक महिन्यांपासून तालुक्याच्या प्रशासकीय नियोजनाला खिळ बसली आहे. सर्वात मोठा महसूली तालुका म्हणून ओळख असलेला अर्जुनी चर्चेत राहू लागला आहे.

Textures of tehsildars in Arjuni-Morgaon | अर्जुनी-मोरगावात तहसीलदारांचे बनावट सही शिक्के?

अर्जुनी-मोरगावात तहसीलदारांचे बनावट सही शिक्के?

अर्जुनी-मोरगाव : गेल्या कित्येक महिन्यांपासून तालुक्याच्या प्रशासकीय नियोजनाला खिळ बसली आहे. सर्वात मोठा महसूली तालुका म्हणून ओळख असलेला अर्जुनी चर्चेत राहू लागला आहे. येथील तहसीलदार डी.सी.बोंबार्डे रुजू झाल्यापासून त्यांच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला जात आहे. त्यातच त्यांचे बनावट सही-शिक्के तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.
तहसीलदारांचे नावाने बनावटी कागदपत्रे, तहसीलदारांच्या सही शिक्यानिशी हुबेहुब तयार करून सर्वसामान्यांना फसविण्याचे काम करणारी टोळी सक्रिय असल्याचे निदर्शनास आणून दिले. यासंबंधी तहसीलदार बांबोर्डे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मी काय करू? असे उत्तर दिल्याचा आरोप तालुका शिवसेनेने केला आहे.
अशा बनावट शिक्क्यातून अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या गंभीर विषयाकडे तहसीलदारांनी पाठ फिरविणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न जनतेसमोर आहेत. बोगस टोळीचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे.

Web Title: Textures of tehsildars in Arjuni-Morgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.