महालगाव येथे रोहयोच्या कामावरील मजुरांची चाचणी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST2021-06-11T04:20:27+5:302021-06-11T04:20:27+5:30

गावातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. गावातील नागरिकांनी कोरोना ...

Testing of Rohyo workers at Mahalgaon () | महालगाव येथे रोहयोच्या कामावरील मजुरांची चाचणी ()

महालगाव येथे रोहयोच्या कामावरील मजुरांची चाचणी ()

गावातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. गावातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने ४५ वयोगटावरील नागरिकांसाठी लसीकरण शिबिर घेण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नारनवरे यांच्या मार्गदर्शनात रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची कोरोना चाचणी तसेच महालगाव, तावशी व निलजच्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

यावेळी सरपंच अशोक कापगते यांनी तिन्ही गावांतील नागरिकांनी कोरोनाला हरविण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येकाने लसीकरण करावे आणि आपले गाव सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी उपसरपंच ओमप्रकाश नाईक यांनी स्वतः लस घेऊन उपक्रमाची सुरुवात केली.

Web Title: Testing of Rohyo workers at Mahalgaon ()