शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

वजन ठेवून होणार एस्कलेटरची टेस्टिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:45 AM

जवळपास सहा महिन्यांपूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकावर एस्कलेटरचे (स्वयंचलित पायऱ्या) काम पूर्ण झाले आहे; मात्र अद्यापही एस्कलेटर प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आले नाही.

ठळक मुद्देसहा महिने लोटले : गोंदिया-समनापूर मार्गाचे निरीक्षण

ऑनलाईन लोकमतगोंदिया : जवळपास सहा महिन्यांपूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकावर एस्कलेटरचे (स्वयंचलित पायऱ्या) काम पूर्ण झाले आहे; मात्र अद्यापही एस्कलेटर प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आले नाही. याबाबत आता वजन ठेवून दोन महिन्यांपर्यंत एस्कलेटरची टेस्टिंग होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामी या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना अजून दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.मागील काही वर्षांपासून गोंदिया रेल्वेस्थानकावर एस्कलेटर लावण्याची मागणी केली जात होती. विशेष म्हणजे पायºया चढणे व उतरण्यासाठी ज्या प्रवाशांना त्रास होत होता.सर्व प्रवासी एस्कलेटर सेवा सुरू होण्याची वाट पाहत होते. प्रवाशांची मागणी पाहून रेल्वे प्रशासनाने बांधकाम सुरू केले. काही कालावधीतच एस्कलेटरचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु बांधकाम होऊन सहा महिन्यांचा काळ लोटला तरी प्रवासी सेवेत ते उपलब्ध झाले नाही.याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, एस्कलेटरची दोन महिने सातत्याने टेस्टींग करण्यात येणार आहे. जपानचे काही अभियंता या कार्यात गुंतले होते. हे काम पूर्ण झाल्यावर एस्कलेटर सुरू होण्याची शक्यता होती. परंतु आता सुद्धा एस्कलेटरची टेस्टींग प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आता वजन ठेवून एस्कलेटरची टेस्टींग करण्यात येणार आहे. या टेस्टिंगनंतरच एस्कलेटर प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होवू शकेल. या टेस्टिंगसाठी आणखी दोन महिन्यांचा काळ लागू शकेल, असेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.शुक्रवारी (दि.२३) रेल्वेचे डीआरएम अमितकुमार अग्रवाल व मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांनी गोंदिया ते समनापूर या रेल्वे लाईनचे निरीक्षण केले आहे. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकातून समनापूरसाठी लवकरच गाडी सुरू करण्यात येईल. दररोज तीन फेऱ्या होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच त्यासाठी वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. मागील महिन्यातच बालाघाट ते समनापूरपर्यंत रेल्वे ट्रक टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.