दहावीत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
By Admin | Updated: July 13, 2015 01:34 IST2015-07-13T01:34:58+5:302015-07-13T01:34:58+5:30
शारदा कॉन्व्हेंट व हायस्कूलच्या प्रेरणास्त्रोत शांता मार्कंडराव बिसेन यांच्या जन्मस्मृतीनिमित्...

दहावीत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
गोंदिया : शारदा कॉन्व्हेंट व हायस्कूलच्या प्रेरणास्त्रोत शांता मार्कंडराव बिसेन यांच्या जन्मस्मृतीनिमित्त दहावीच्या परीक्षेत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवारी करण्यात आला. अतिथी म्हणून भुवन बिसेन, संचालिका योगिता बिसेन, प्राचार्य उषा रहांगडाले, शिक्षक अग्रवाल व तारा खोटेले उपस्थित होते.
याप्रसंगी अतिथींच्या हस्ते दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये वैभव पांडे, नवनीत खोटेले, अक्षय सांडेकर, तेजस्विनी ठाकरे, रोहित शरणागत, मुकुल बिसेन, अभिषेक इटानकर, पंकज सहारे, लक्ष्मी सोनवाने, पूजा रहांगडाले यांचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी शिक्षक विनोद खोब्रागडे, तक्षशिला चचाने, शबाना शेख, संतोषसिंह नैकाने, नेहा पटले, वैशाली कुथे, शहारूनिसा पठान, पंजक फुंडे, राजेश बिसेन, धनेश्वर सारंगपुरे, निशा मुनेश्वर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)