‘त्या’ वृद्धाच्या संपर्कातील व्यक्तींने वाढविले टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:28+5:30

गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील एका ६४ वर्षीय वृध्दाचा २५ जून रोजी नागपूर येथील मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून या मृतकाच्या संपर्कात आलेल्या ७० ते ८० जणांना आतापर्यंत क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. यापैकी जवळपास ३० जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

Tensions were heightened by people in contact with 'that' old man | ‘त्या’ वृद्धाच्या संपर्कातील व्यक्तींने वाढविले टेन्शन

‘त्या’ वृद्धाच्या संपर्कातील व्यक्तींने वाढविले टेन्शन

Next
ठळक मुद्देआणखी आठ कोरोना बाधितांची भर : अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या पोहचली ५८ वर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील आठवडाभरापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. शनिवारी (दि.४) पुन्हा ८ जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा ५८ वर पोहचला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील एका ६४ वर्षीय वृध्दाचा २५ जून रोजी नागपूर येथील मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून या मृतकाच्या संपर्कात आलेल्या ७० ते ८० जणांना आतापर्यंत क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. यापैकी जवळपास ३० जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर शनिवारी आणखी याच वृध्दाच्या संपर्कात आलेल्या ७ जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले.
त्यामुळे गोंदिया तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून हा तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट होत चालला आहे. शनिवारी आढळलेल्या एकूण आठ कोरोना बाधितांमध्ये ७ गोंदिया तालुक्यातील तर तिरोडा तालुक्यातील बेरडीपार येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यातील एकूण अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधितांचा आकडा ५८ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत एकूण १६४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यापैकी १०४ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण ३७१३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले असून यापैकी १६४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
तर ३५४९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर १२८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त व्हायचा आहे.

कुंभारे नगरातील कोरोना बाधितांची संख्या १३ वर
मुंडीपार येथील मृतक वृध्दाच्या संपर्कात आलेल्यांपैकी आतापर्यंत एकूण ३८ जणांना कोरोनाचा लागण झाली आहे. यातील १३ कोरोना बाधित हे कुंभारे नगरातील आहे. या भागात रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान नगर परिषदेने शनिवारपासून या भागात आरोग्य विषयक सर्वेक्षण सुरू केले आहे.

Web Title: Tensions were heightened by people in contact with 'that' old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.