टेन्शन ! बाधितांचा आकडा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:28+5:302021-01-24T04:13:28+5:30

गोंदिया : मागील २ दिवसापासून जिल्ह्यात कोेरोनाबाधितांची संख्या एक अंकी येत असतानाच शनिवारी (दि.२३) पुन्हा दोन अंकी आकडा आल्याने ...

Tension! The number of victims increased | टेन्शन ! बाधितांचा आकडा वाढला

टेन्शन ! बाधितांचा आकडा वाढला

गोंदिया : मागील २ दिवसापासून जिल्ह्यात कोेरोनाबाधितांची संख्या एक अंकी येत असतानाच शनिवारी (दि.२३) पुन्हा दोन अंकी आकडा आल्याने टेन्शन वाढले आहे. शनिवारी १२ नवीन बाधितांची भर पडली असून ११ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे दिसले. म्हणजेच बाधित जास्त व मात करणारे कमी अशी आकडेवारी आल्याने बाधितांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. आता जिल्ह्यात १४१ क्रियाशील रुग्ण आहेत.

जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १४०९५ पर्यंत गेला असून यातील १३७७३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने जिल्ह्याची स्थिती दिलासादायक आहे. मात्र शनिवारी १२ नवीन बाधितांची नोंद करण्यात आली असून यामध्ये गोंदिया तालुक्यात ८, गोरेगाव २ तर देवरी तालुक्यातील २ रुग्ण आहेत. ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ६, आमगाव २, सालेकसा १ तर देवरी तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. यानंतर आता जिल्ह्यात १४१ क्रियाशील रुग्ण उरले असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ७८, तिरोडा १२, गोरेगाव ५, आमगाव २१, सालेकसा १२, देवरी ४, सडक-अर्जुनी ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४ तर इतर राज्य व जिल्ह्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.

-------------------------

आमगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर

जिल्ह्यात १४१ क्रियाशील रुग्ण असून यामध्ये सर्वाधिक ७८ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आमगाव तालुका असून येथे २१ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, कधी दुसऱ्या क्रमांकावर असलेला तिरोडा तालुका नियंत्रणात आल्याने आता या स्थानावरून उतरला असून येथे फक्त १२ रुग्णांची नोंद आहे.

Web Title: Tension! The number of victims increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.