टेन्शन ! मात करणाऱ्यांपेक्षा बाधित जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST2021-02-07T04:27:34+5:302021-02-07T04:27:34+5:30

शनिवारी आढळून आलेल्या १६ नवीन बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील ९ व तिरोडा तालुक्यातील ७ रुग्ण आहेत. म्हणजेच, जिल्ह्यातील दोन्ही कोरोना ...

Tension! More constrained than overcome | टेन्शन ! मात करणाऱ्यांपेक्षा बाधित जास्त

टेन्शन ! मात करणाऱ्यांपेक्षा बाधित जास्त

शनिवारी आढळून आलेल्या १६ नवीन बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील ९ व तिरोडा तालुक्यातील ७ रुग्ण आहेत. म्हणजेच, जिल्ह्यातील दोन्ही कोरोना हॉटस्पॉट तालुक्यांत पुन्हा कोरोना डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे, तर कोरोनावर मात करणाऱ्या १५ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ५, गोरेगाव १, आमगाव ६, देवरी १ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ रुग्ण आहेत. यानंतर आता जिल्ह्यात ९५ रुग्ण क्रियाशील असून, यात गोंदिया तालुक्यातील ६५, तिरोडा १५, गोरेगाव ३, आमगाव ५, देवरी २, सडक-अर्जुनी १, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३, तर इतर जिल्हा व राज्यातील १ रुग्ण आहे.

--------------------------

१,३२,५०० कोरोना चाचण्या

जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात दिसत असला तरीही आरोग्य विभागाकडून कोरोना चाचण्यांमध्ये वाढ केली जात असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,३२,५०० चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६६,४९९ आरटी-पीसीआर असून ८,४०९ पॉझिटिव्ह, तर ५४,८२५ निगेटिव्ह आल्या आहेत, तसेच ६६,००१ रॅपिड अँटिजन चाचण्या असून, ६,१२४ चाचण्या पॉझिटिव्ह, तर ५९,८७७ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

--------------------------------

१८३ रुग्णांचा गेला जीव

जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असला तरी मरणसत्र सुरूच असून, आतापर्यंत १८३ रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १०२, तिरोडा २३, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव ११, तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत.

Web Title: Tension! More constrained than overcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.