शेतकऱ्यांवर वाढतेय कर्जाचे ‘टेंशन’

By Admin | Updated: December 17, 2015 01:54 IST2015-12-17T01:54:41+5:302015-12-17T01:54:41+5:30

गोंदिया जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे व किडीच्या आक्रमणामुळे उत्पादन कमी ...

'Tension' on loans to farmers | शेतकऱ्यांवर वाढतेय कर्जाचे ‘टेंशन’

शेतकऱ्यांवर वाढतेय कर्जाचे ‘टेंशन’

मुंडीकोटा : गोंदिया जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे व किडीच्या आक्रमणामुळे उत्पादन कमी व लागलेला खर्च अधिक झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना कर्जाच्या परतफेडीचे टेंशन येत आहे.
तिरोडा तालुक्यात मुंडीकोटा परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. यावर्र्षीे निसर्गाने साथ दिली नाही. त्यामुळे एका पावसासाठी धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. ज्या शेतकऱ्यांकडे विद्युत पंप तसेच सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे त्यांनी थोडे फार उत्पन्न घेतले. पण इतर शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मावा, तुडतुड्याने हातात येणारे पीक गेले. यावर्षी धानावर गादमासी, करपा, तुडतुडा, मावा, तोंड्या अळीचा प्रादुर्भाव होता. या रोगाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावून नेला. शेतकऱ्यांनी रासायनिक औषधीची बरेचदा फवारणी केली. परंतु फायदा झाला नाही. पुन्हा परिस्थिती जशीच्या तशीच झाली.पण दिवाळीचा सण समोर येताच हलक्या धानाची कापणी व मळणी केली. दिवाळीच्या खर्चासाठी व्यापाऱ्यांना धान विकावे लागले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कमी भावाने धान घेऊन शेतकऱ्यांची लूबाडणूक करुन दिशाभूल केली. शेतकरी चहूबाजूनी संकटात सापडला आहे. जो दिवस निघतो तो शेतकऱ्यांसाठी सारखाच उगवतो. आधी मिळालेल्या कर्जानंतर खरीप पिकांच्या भरवशावर कर्जाची उचल केली. तेही कर्ज शेतकऱ्यांकडून परत फेड करने होत नाही.
पिकेल तरच विकेल पण काय? चांगल्या उत्पादनाच्या आशेवर कर्जबाजारी होतात. बँकाकडून घेतलेले पैसे यामुळे शेतकरी पूर्णत: संकटात सापडला आहे. कर्ज कसे फेडावे, मुलाबाळांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह व हंगागात पैसे कोठून आणावे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
अच्छे दिनचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांची उपेक्षा भंग केली. आणि खोटी फसवणूक केली. शेतकऱ्यांना यावेळी बुरे दिनाचा सामना करावा लागत आहे. गरीब शेतकऱ्यांजवळ फक्त पोट भरण्यासाठी धान उरले आहेत. बाकी धान्य खर्चापायी व्यापाऱ्यांना विकून टाकले. पण यावेळी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडे बँकेनी वसुलीचा तगादा लावत आहेत.
पण यावेळी शेतकरी कर्ज कुठून देणार अशी गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांची दिसत आहे. पण वसुलीची गाडी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचत असते. त्यामुळे शेतकरी दारातून पळवाट काढतात. मग कशासाठी गाडी घेऊन अधिकारी दररोज डिझेल व पेट्रोल जाळून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जात असतात. पण एक जरी शेतकरी मिळाला तर तो म्हणतो साहेब यावर्षी मी कर्ज देऊ शकत नाही. कर्ज वसूली शुन्य व डिझेल पेट्रोल खर्च अधिक. मग याला काय म्हणावे. शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या वसुलीची कारवाई थांबवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकरी आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.(वार्ताहर)

Web Title: 'Tension' on loans to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.