शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:26 IST

दहावीनंतर विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागू नये यासाठी शासनाच्या मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनातंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र कायम विनाअनुदानित विद्यालयातील विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती दिली जात नसल्याने जिल्ह्यातील दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत असल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देकायम विनाअनुदानीत विद्यालय। माहितीचा अभाव, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान, यंदा करणार जनजागृती

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दहावीनंतर विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागू नये यासाठी शासनाच्या मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनातंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र कायम विनाअनुदानित विद्यालयातील विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती दिली जात नसल्याने जिल्ह्यातील दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत असल्याची बाब पुढे आली आहे.जिल्ह्यात अनुदानीत, कायम विना अनुदानीत आणि स्वंयअर्थसाह्यीत विद्यालय आहेत. यापैकी अनुदानीत विद्यालयात इयत्ता ११ आणि १२ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनातंर्गत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. मात्र कायम विनाअनुदानित विद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यालयाकडून शिष्यवृत्ती दिली जात असल्याची माहितीच दिली जात नसल्याने त्यांना शिष्यवृत्ती मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.जिल्ह्यात ११५ कायम विना अनुदानीत शाळा व विद्यालय असून यामध्ये १५ हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शासनाच्या निर्णयानुसार खुला प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनातंर्गत ११ आणि १२ वीतील विद्यार्थ्यांना वार्षिक १८०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.यामुळे विद्यार्थ्यांना पाठपुस्तकांचा आणि शैक्षणिक खर्च भागविण्यास थोडीफार मदत होत असते. आर्थिक अडचणीमुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा देखील शासनाचा या मागील हेतू आहे. मात्र कायम विनाअनुदानीत विद्यालयात इयत्ता ११ व १२ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्तीच मागील तीन चार वर्षांपासून मिळत नसल्याची माहिती आहे.लोकमतने याची खोलात जावून चौकशी केली असता कायम विना अनुदानीत शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सुध्दा या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यास ही विद्यालये असमर्थ ठरत आहे. पण याचा फटका जिल्ह्यातील विविध प्रवर्गातील १० हजारावर विद्यार्थ्यांना बसत असून बºयाच विद्यार्थ्यांना मोलमजुरी करुन शिक्षण घ्यावे लागत आहे.सामाजिक न्यायमंत्र्यांच्या जिल्ह्यातच समस्याराज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या गृह जिल्ह्यातच कायम विना अनुदानीत विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेच्या माहितीअभावी शिष्यवृत्ती मिळण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. हा प्रकार मागील दोन तीन वर्षांपासून सुरू असल्याची माहिती असून याकडे संबंधित विद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे सुध्दा याकडे दुर्लक्ष झाले आहे.शिष्यवृत्ती योजनांपासून विद्यालय अनभिज्ञशासनातर्फे खुला प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे. शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या विविध योजना आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना आर्थिक मदत होते. मात्र या योजनांची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनाच नसल्याची बाब पुढे आली आहे. याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसत आहे.बºयाच विद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेची माहिती नाही. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी यंदा यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिर घेवून त्यात मुख्याध्यापक आणि शिक्षकांना शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली जाईल. एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनांपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेवू.- ए.पी.कछवे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.गोंदिया.स्वंयअर्थसहाय्यीत विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची तरतूद नाही. मात्र याही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी असा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन असून लवकरच त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.- मंगेश वानखेडे, समाज कल्याण उपायुक्त गोंदिया.पदवीचे शिक्षण घेताना अडचणकायम विना अनुदानीत विद्यालयांमध्ये १२ वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. त्यानंतर पदवी शिक्षणासाठी दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. तेव्हा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात. मात्र ११ वी आणि १२ वी मध्ये शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेवू न शकल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात गेल्यावर आधी शिष्यवृत्तीचा लाभ का घेतला नाही याचा ठोस कारण द्यावे लागते. त्यामुळे मोठी अडचण होत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती