भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांना १० हजारांचा दंड

By Admin | Updated: September 19, 2015 02:49 IST2015-09-19T02:49:09+5:302015-09-19T02:49:09+5:30

तालुक्यातील चांदोरी खुर्द येथे तुळशीराम गोंधुळे यांचा प्लॉट भाऊराव गोंधुळे, लिलाबाई गोंधुळे यांनी पदाचा दुरुपयोग करुन ग्रामपंचायत रेकार्डला नोंदविल्याची तक्रार करण्यात आली.

Ten thousand penalties for encroachers on the plot | भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांना १० हजारांचा दंड

भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांना १० हजारांचा दंड

तिरोडा : तालुक्यातील चांदोरी खुर्द येथे तुळशीराम गोंधुळे यांचा प्लॉट भाऊराव गोंधुळे, लिलाबाई गोंधुळे यांनी पदाचा दुरुपयोग करुन ग्रामपंचायत रेकार्डला नोंदविल्याची तक्रार करण्यात आली. त्यावर नायब तहसीलदार विलास कोकवार यांनी १० हजार रुपये दंड तसेच प्रतिवर्ष ५० रुपये भू आकारणी असे एकूण १० हजार २५० रुपये वसूल करण्याचे आदेश दिले.
टिकाराम गोंधुळे यांचे वडिल श्रीपत गोंधुळे यांना चांदोरी खुर्द येथे १९६३ ला आबादी प्लॉट क्र.६२ व ४९ शासनाकडून मंजूर झाले आहे. क्र.४९ वर त्यांचे राहते घर तर ६२ वर गुरेढोरे, शेतीची औजारे ठेवण्यासाठी २०११ ला कच्ची झोपडी बांधली. सदर झोपडी भाऊराव गोंधुळे यांनी पाडून जबरदस्तीने अतिक्रमण करुन त्या प्लॉटवर कुंपन घातले आहे.
सदर प्रकरणात नायब तहसीलदार विलास कोकवार यांनी गैरअर्जदार लिलाबाई गोंधुळे चांदोरी खुर्द यांचेकडून सन २०११-१२ ते सन २०१५-१६ या कालावधीकरीता प्रतिवर्ष २००० रुपये प्रमाणे पाच वर्षाकरिता १०,००० रुपये दंड व ५० रुपये प्रतिवर्ष भुआकारणी असे १०२५० रुपये वसूल करावे, असा आदेश जारी केला. गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्याच्या १५ दिवसाचे आत अतिक्रमण रिकामे करावे, न केल्यास शसकीय यंत्रणेमार्फत अतिक्रमण हटविण्यात येईल व त्यावर लागणारा खर्च वसूल करण्यात येणार आहे.

Web Title: Ten thousand penalties for encroachers on the plot