४४ कृषी केंद्रांवर तात्पुरती बंदी
By Admin | Updated: June 19, 2014 23:52 IST2014-06-19T23:52:50+5:302014-06-19T23:52:50+5:30
बियाणे विक्री करताना शेतकऱ्यांची फसगत होऊ नये म्हणून योग्य ती काळजी न घेणाऱ्या जिल्ह्यातील ४४ धान बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर कृषी विभागाने तात्पुता प्रतिबंध घातला आहे.

४४ कृषी केंद्रांवर तात्पुरती बंदी
कागदपत्रांत अनियमितता : कृषी विभागाची कारवाई
गोंदिया : बियाणे विक्री करताना शेतकऱ्यांची फसगत होऊ नये म्हणून योग्य ती काळजी न घेणाऱ्या जिल्ह्यातील ४४ धान बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर कृषी विभागाने तात्पुता प्रतिबंध घातला आहे. सदर कृषी केंद्रांच्या संचालकांना दस्तावेज योग्य करण्यासाठी काही कालावधी देण्यात आला आहे. तोपर्यंत सदर केंद्रांवर कृषी साहित्य विक्री करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हा कृषी विभागाच्या वतीने भरारी पथकाने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील विविध धान बियाणे विक्री केंद्रांची तपासणी केली होती. यावेळी ४४ केंद्रांवर अनियमितता आढळून आली. यात प्रामुख्याने निकषाप्रमाणे दस्तावेजांना योग्यरित्या ठेवण्यात आले नव्हते. कोणाजवळही स्टॉकची प्रमाणित माहिती नव्हती. तसेच इतर काही माहितीचा अभाव होता. यामुळे शेतकऱ्यांना माल विक्री करताना फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
या केंद्रांच्या संचालकांना दस्तावेजांमध्ये सुधार करण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच तोपर्यंत त्यांच्या केंद्रांवरील विक्री थांबविण्यात आली. शेवटी सर्व केंद्र संचालकांकडून आपल्या दुकानातील अनियमितता दूर केली जात आहे. जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी पी.एन. मोहाडीकर यांनी सांगितले की, या दरम्यान झालेल्या तपासणीत कोणाजवळही बनावटी धानाचे बियाणे आढळले नाही. (प्रतिनिधी)