देवरीच्या तहसीलदारांनी केला दोन दुकानांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST2021-04-19T04:26:39+5:302021-04-19T04:26:39+5:30
गोंदिया : कोरोनाचा उद्रेक झपाट्याने वाढत असताना जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम पाळत अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे; ...

देवरीच्या तहसीलदारांनी केला दोन दुकानांना दंड
गोंदिया : कोरोनाचा उद्रेक झपाट्याने वाढत असताना जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम पाळत अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे; परंतु किराणा दुकानदारही आपल्याला सूट मिळाल्याचे गृहीत धरून मनमर्जी कारभार करीत आहेत. कोरोनाचे नियम न पाळत दुकान चालविणाऱ्या सावली येथील दोन दुकानदारांना प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावला आहे. देवरी येथील तहसीलदार विजय बोरुडे यांनी या दोन्ही दुकानांवर दंड केला आहे. १८ एप्रिल रोजी देवरी तालुक्याच्या सावली येथील गोविंद असाटी यांच्या गोविंद किराणा स्टोअर्समध्ये कोरोनासाठी घालून दिलेले नियम दुकानदाराने पाळले नाहीत, तसेच सावली येथील मुकेश किराणा दुकानात कोरोना नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्या दोन्ही दुकानदारांना प्रत्येकी १० हजार असा २० हजारांचा दंड ठोठावला आहे. ती रक्कम शासनजमा करण्यात आली आहे.