यशाचे खरे श्रेय चमूला असते
By Admin | Updated: October 19, 2015 02:09 IST2015-10-19T02:09:17+5:302015-10-19T02:09:17+5:30
यशाची ट्राफी नायकाला मिळत असली तरी यश हे सर्व चमुचे असते असे प्रतिपादन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केले.

यशाचे खरे श्रेय चमूला असते
नागो गाणार यांचे प्रतिपादन : शिक्षक परिषदेचा तालुका मेळावा
गोंदिया : यशाची ट्राफी नायकाला मिळत असली तरी यश हे सर्व चमुचे असते असे प्रतिपादन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या तालुका मेळाव्यात शनिवारी (दि.१५) मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
येथील रामदेवरा मंदिर सभागृहात आयोजित मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डी.एम. राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सहकार्यवाह सतीश मंत्री, जिल्हा कार्याध्यक्ष सनत मुरकुटे, आनंदप्रकाश ठाकूर, जिल्हाध्यक्ष लीलेश्वर बोरकर, कार्यवाह अरुण पारधी, सहकार्यवाह दिनेश कोहळे, जिल्हा कोषाध्यक्ष गुणेश्वर फुंडे, प्रचारप्रमुख सुरेश गारोडे उपस्थित होते.
प्रारंभी माता शारदेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलीत करण्यात आले. विमलताई विद्यालयाच्या विद्यार्थीनीनी स्वागत गीत सादर केले. तर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले.
मेळाव्यात महागाई भत्ता संचमान्यता, सरल डाटा, शहर कार्यकारिणी आदि विषयांसह शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी शिक्षकांच्या प्रलंबित समस्या यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन आमदार गाणार यांनी दिले. यावेळी सतीश मंत्री, सनत मुरकुटे, लीलेश्वर बोरकर, अरूण पारधी यांनीही सभेला मार्गदर्शन केले.
संचालन आनंद बिसेन यांनी केले. आभार राजेंद्र तोमर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रमोद बिसेन, बी.एस. मेंढे, भुवन बिसेन, अपाले यांच्यासह शिक्षक परिषदेच्या अन्य पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
मेळाव्याला तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा, तालुका, शहर कमेटीची पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने हजर होते. (तालुका प्रतिनिधी)