शिक्षकांनी तंत्रज्ञानाची कास धरणे अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST2021-02-05T07:50:04+5:302021-02-05T07:50:04+5:30
सडक-अर्जुनी : नविन शैक्षणिक धोरणाचा प्रारूप कायम झालेला आहे. भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत. झालेले बदल, शिक्षण ...

शिक्षकांनी तंत्रज्ञानाची कास धरणे अनिवार्य
सडक-अर्जुनी : नविन शैक्षणिक धोरणाचा प्रारूप कायम झालेला आहे. भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत.
झालेले बदल, शिक्षण क्षेत्रातील कार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाला स्वीकारून ते पुढील पिढीला अवगत करावयाचे आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वांना तंत्रज्ञान आत्मसात करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहेचवावे लागणार आहे, असे प्रतिपादन प्राचार्य राजेश रुद्रकार यांनी केले.
जिल्हा शिक्षण प्राशिक्षण संस्थेच्या वतीने गुरुवारी (दि.२८) तालुक्यातील ग्राम खजरी येथील आदिवासी विकास हायस्कूल व कला विज्ञान विद्यालयात आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी अधिव्याख्याते भाऊराव राठोड, अधिव्याख्याते डाॅ.प्रदीप नाकतोडे, प्राचार्य खुशाल कटरे, केंद्रप्रमुख एस.सी.सिंगनजुडे, प्राचार्य डी.एल.मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. एकदिवसीय कार्यशाळेत, लाॅकडाऊन काळात शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित होत असलेल्या स्वाध्याय मालिकेत, भरक-२० यासह विविध उपक्रमांत सर्वच विद्यार्थी कसे सहभागी करता येतील? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न चर्चेतून केला गेला. डायटच्या वतीने तयार केलेले शैक्षणिक व्हिडीओ यूट्युब चॅनलवरून कसे अभ्यासता येईल, रोजगारासाठी महा कॅरिअर पोर्टलचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल, विविध शैक्षणिक ॲप कोणते, यापैकी रीड टू मी, दिक्षा ॲप, तेजस ॲप आदी प्रत्येक विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी नियोजन करण्याचे व शिक्षण क्षेत्रातील संशोधकांनी आपले संशोधन, संशोधन-पोर्टलवर करण्यास सांगतले गेले. संचालन गुलाब लंजे यांनी केले. आभार प्राचार्य कटरे यांनी मानले.