जि.प.वर शिक्षक संघाचा मोर्चा
By Admin | Updated: May 1, 2017 00:52 IST2017-05-01T00:52:34+5:302017-05-01T00:52:34+5:30
आपल्या विविध मागण्यांना घेवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा जिल्हास्तरीय मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला.

जि.प.वर शिक्षक संघाचा मोर्चा
विविध मागण्या : जि.प. अध्यक्षांनी दिली समस्या मार्गी लावण्याची हमी
गोंदिया : आपल्या विविध मागण्यांना घेवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा जिल्हास्तरीय मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. या वेळी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांना निवेदन दिले.
सदर मोर्चाचे आयोजन शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्रकुमार कटरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी मोर्चा व धरणे आंदोलनात प्रामुख्याने विभागीय अध्यक्ष नूतन बांगरे, कोषाध्यक्ष सुधीर वाजपेयी, संपर्क प्रमुख नागसेन भालेराव, संघटक केदारनाथ गोटेफोडे, शंकर नागपुरे, वाय.एस. मुंगुलमारे, ओमेश्वरी बिसेन, शंकर चव्हाण, पवन कोहळे, सुमेधा गजभिये, पी.के. पटले उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस अनिरूद्ध मेश्राम यांनी मांडले. तसेच जिल्हा कार्याध्यक्ष यू.पी. पारधी, जुणी पेंशन हक्क योजनेचे सचिव सचिन राठोड, दुर्गाप्रसाद कोकोडे, वाय.बी. पटले, विजय डोये, विनोद लिचडे, गणेश चुटे, जी.जी. खराबे, अरविंद उके, राजू गुन्नेवार, राहुल कोतमवार, यशोधरा सोनेवाने, नितू डहाट यांनी मोर्चाला संबोधन केले.
यानंतर शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवेदन दिले. तसेच शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांच्या सभा कक्षामध्ये पाचारण करण्यात आले. या वेळी शिक्षणाधिकारी (प्राथ) उल्हास नरड, वित्त व लेखाधिकारी मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या जिल्हास्तरावरील मुद्यांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. त्यावेळी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनी संपूर्ण मुद्दे निकाली काढण्याची हमी दिली. शेवटी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे व जि.प.चे शिक्षण तथा आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी धरणे आंदोलनाला भेट दिली.
मोर्चात डी.एस. कोल्हे, सी.एस. कोसरकर, दिनेश बोरकर, मयूर राठोड, राहुल कळंबे, वाय.एस. भगत, ए.डी. पठान, सचिन राठोड, वामनराव गोळंगे, संतोष बिसेन, राजू पाटील, टी.आर. लिल्हारे, रमेश संग्रामे, जी.जी. दमाहे, डी.बी. पटले, एन.एस. कोरे, अरविंद नाकाडे, रमेश भलावी, राजू कटरे, सुरेश मेश्राम, चेतन उईके, एस.बी. परिहार, के.बी. गभणे, नंदा पारधी, भीमराव गहाणे, बडवाईक आदी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.(प्रतिनिधी)
जिल्हास्तरावरील मागण्या
प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला वेतन जमा करावे. दर दोन महिन्यांनी संघटनेला शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ द्यावे. पं.स. सडक-अर्जुनी येथील जीपीएफची अफरातफर झाली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण वित्त व लेखाधिकाऱ्यांनी सोडवावे. मार्च २०१४ पासून शिक्षकांच्या जीपीएफ खात्यात एकही रक्कम जमा झाली नाही. ती त्वरित जमा करून दोन वर्षांच्या पावत्या शिक्षकांना द्यावे. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके तात्काळ मंजूर करण्यात यावी. १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणीची यादी काढावी. महिला शिक्षकांची प्रसूती रजा पूर्व मंजूर करून नियमित वेतन द्यावे, आदी अनेक मागण्यांचा समावेश आहे.