शिक्षकांच्या मागण्या त्वरित निकाली निघणार
By Admin | Updated: October 26, 2016 02:38 IST2016-10-26T02:38:01+5:302016-10-26T02:38:01+5:30
जिल्ह्यातील शिक्षकांच्या अनेक समस्या व मागण्या प्रलंबित असून त्या अनुषंगाने शनिवारी (दि.२२) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक

शिक्षकांच्या मागण्या त्वरित निकाली निघणार
शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन : शिक्षक समितीची सकारात्मक चर्चा
गोंदिया : जिल्ह्यातील शिक्षकांच्या अनेक समस्या व मागण्या प्रलंबित असून त्या अनुषंगाने शनिवारी (दि.२२) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सहविचार सभेतील ठरावानुसार सोमवारी (दि.२४) प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक राहिली असून शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व मागण्या त्वरीत निकाली काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
मासिक वेतन एक तारखेला देण्यात यावे, माहे आॅक्टोबर चे वेतन दिवाळी सणापुर्वी देऊन नोव्हेंबरच्या वेतनात महागाई थकबाकी काढण्याची संबंधितांना सुचना देण्यात यावी, प्रलंबित पुरवणी देयके नोव्हेंबरच्या वेतनासोबत शालार्थद्वारे काढण्यात यावे, अंशदायी पेंशनधारक शिक्षकबांधवांचा कपातीचा हिशेब देण्यात यावा, प्रलंबित आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अप्रशिक्षीत शिक्षकांना नियमितचे आदेश तातडीने देण्यात यावे, निवडश्रेणी वरिष्ठ वेतनश्रेणी व चटोपाध्याय प्रलंबित प्रकरणे त्वनित निकाली काढणे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत वाटप करण्याची बक्षीस रक्कम त्वरित देण्यात यावी, वाचन भत्ता प्रकरण निकाली काढावे, जी.टी.खाते अद्ययावत करुन पावती वाटप करणे, प्रलंबित असलेला शालेय पोषण आहार मानधन, इंधन व भाजीपाला खर्च दिवाळीपुर्वी देण्यात यावा, पदवीधर शिक्षकांच्या वेतनातील तफावत दुर करणे, एकस्तर पदोन्नतीनुसार व शिक्षक उ.श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांना वेतनवाढ देण्यात यावी, हिंदी-मराठी सुट तसेच उच्च परीक्षेला बसण्यासाठी पूर्ण व कार्योत्तर परवानगीची प्रकरणे त्वरित निकाली काढावी, ४ टक्के सादिल शाळा व दुरुस्ती अनुदान त्वरित जमा करण्यासाठी कार्यवाही करावी, सुवर्ण जयंती आदिवासी शिष्यवृत्तीचे धनादेश त्वरित देण्यात यावे, वैद्यकीय प्रतीपुर्ती प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी कार्यवाही करावी, जास्तीचे खर्च झालेली गणवेश रक्कम शाळांना त्वरित मिळावी, या सर्व मागण्यांना घेऊन शिक्षणाधिकारी नरड यांच्यासोबत शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.
विशेष म्हणजे ही सकारात्मक ठरल व शिक्षणाधिकारी नरड यांनी सर्व प्रश्न व मागण्या तातडीने निकाल काढण्यात येईल असे आश्वासित केले.
शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे, किशोर डोंगरवार, विनोद बडोले, संदीप तिडके, सुरेश कश्यप, एन.बी. बिसेन, सी.आर. पारधी, एस.सी. पारधी, पी.आर. लिल्हारे, प्रदीप रंगारी, संजीव बोपचे, दीपक कापसे, रोशन म्हसकरे, पी.बी. सयाम, विशाल कच्छनाय, ए.टी. टेंभुर्णीकर, तेजराम नंदेश्वर, सुशील पाऊलझगडे आदींचा समावेश होता.
(शहर प्रतिनिधी)