शिक्षक समिती करणार धरणे आंदोलन
By Admin | Updated: May 30, 2014 23:59 IST2014-05-30T23:59:34+5:302014-05-30T23:59:34+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या तीन महिन्याच्या प्रलंबित वेतनासाठी व इतर समस्या निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक

शिक्षक समिती करणार धरणे आंदोलन
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या तीन महिन्याच्या प्रलंबित वेतनासाठी व इतर समस्या निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित व जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद गोंदियाच्या कार्यालयासमोर ७ जूनला शिक्षक समिती धरणे आंदोलन करणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना आयकर कपातीमुळे माहे फेब्रुवारी महिन्याचे पगार अल्पशा मिळाले आहे. फेब्रुवारीनंतर मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्याचे वेतन न मिळाल्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची पाळी आली आहे.
कोणत्याही कर्मचार्याला महिन्याच्या एक तारखेला वेतन देण्याचे आदेश असूनसुद्धा शालार्थ प्रणालीप्रमाणे वेतन देण्यात येणार असे सांगून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना तीन महिन्यापासून वंचित ठेवले आहे. ज्यामुळे शिक्षकांना उपजिविका चालविण्याकरिता अनेक कष्ट भोगावे लागत आहे. पगार न झाल्यामुळे शिक्षकांवर इतर पतसंस्थेच्या बँकेचा नाहक व्याज सहन करावे लागत आहे. याला जिल्हा परिषदेचे अधिकारी जबाबदार ठरत आहेत.
मुख्यालयी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात काम करणार्या कर्मचार्यांना पूर्वी प्रमाणे वेतन देण्यात आले आहे. परंतु शिक्षकांना शालार्थ प्रणालीचा मुद्दा समोर करुन आजपर्यंत वेतनापासून वंचित ठेवले आहे. याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन सदर महिन्याचे वेतन ५ जूनपर्यंंत करण्याची विनंती केली आहे. जर ५ जूनपर्यंंत पगार देण्यात आले नाही तर ७ जूनला जिल्हा परिषद गोंदियाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष दीक्षित, महासचिव एल.यू. खोब्रागडे, कार्याध्यक्ष शेषराव येडेकर, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, चिटनिस पी.आर. पारधी, कोषाध्यक्ष एस.सी. पारधी, संघटक व्ही.जी. राठोड, महिला प्रतिनिधी मनु उके, टेलन बन्सोड, पुष्पा तुरकर, संचालक सुरेश रहांगडाले, बेनीराम भानारकर, तुळसीकर, बडवाईक, चव्हाण यांनी केले आहे.