शिक्षक भारतीचे शिक्षक दिनीच धरणे आंदोलन

By Admin | Updated: September 6, 2015 01:39 IST2015-09-06T01:39:29+5:302015-09-06T01:39:29+5:30

विविध मागण्यांचा समावेश : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर

Teacher Bharati teacher take up the movement | शिक्षक भारतीचे शिक्षक दिनीच धरणे आंदोलन

शिक्षक भारतीचे शिक्षक दिनीच धरणे आंदोलन


विविध मागण्यांचा समावेश : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर
गोंदिया : आपल्या विविध मागण्यांना घेवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटना व माध्यमिक शिक्षक भारती संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी डी.बी. गावळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांना वापरलेले अपमानजनक शब्द मागे घ्यावे, वस्तीशाळा शिक्षकांची सेवा मुळ नियुक्तीपासून ग्राह्य धरण्यात यावी, जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी, पहिली ते आठवीच्या मुलामुलींना शंभरटक्के मोफत गणवेश देण्यात यावे, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ नका, शिक्षणाचा हक्क साबूत ठेवा, सर्व विना अनुदानित शाळा महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान सुरू करा, सदोष संच मान्यता रद्द करा, आॅफलाईन पगार आॅनलाईन करा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या आॅनलाईन पटसंख्येचे निकष रद्द करा, स्पेशन स्कुल एमसीव्हीसी शिक्षकांना आॅनलाईन पगार सुरू करा, शिक्षक-शिक्षकेत्तर भरतीवरील बंदी उठवा, चिपळुनकर समिती लागू करा, कंत्राटीकरण/शिक्षण सेवक पद्धत बंद करा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका, सरलची डोकेदुखी बंद करा, डाटा एन्ट्री आऊटसोर्सिंग करा, रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व मोफत व्ह्या पुस्तके द्या, मुलींना ५ रुपये उपस्थिती भत्ता द्या, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करा, आंतरजिल्हा बदलीसाठी राज्यस्तरीय एकच रोष्टर असावे, शिक्षकांना एमएससीआयटी बंधनकारक करू नये, महिला शिक्षकांना केंद्राप्रमाणे संगोपन रजा द्या, डीटीएड पास अप्रशिक्षित शिक्षकांना त्वरित सहायक शिक्षकाचा आदेश देण्यात यावे, प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला पगार द्यावा, सर्व शिक्षकांचे १ मार्च २०१४ पासून थकबाकी वेतन देण्यात यावे, जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला सत्र २०१४-१५ चे सादिलवार देण्यात यावे अशा विविध मागण्यांचा समावेश होता.
या धरणे आंदोलनाला प्राथमिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरडे, सचिव प्रमेश बिसेन, कार्याध्यक्ष गुलाबराव मौदेकर, माध्यमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनेवाने, कार्याध्यक्ष राजेंद्र पटले, जिल्हासचिव जितेंद्र पटले, विभागीय उपाध्यक्ष भाऊराव पत्रे, संतोष बारेवार, आर.वाय. बारसे, आर.सी. टेंभरे, पी.एस. रहांगडाले, एस.बी. बिसेन, संतोष मेंढे, के.एफ. बहेकार, आर.पी. सोनवाने, ममता चुटे, नलिनी नागरिकर, आशा रहांगडाले, लक्ष्मीकांत विठ्ठले, प्रतिभा डोंगरे, आर.डी. पारधीकर, जे.जी. चक्रेल, नरेंद्र बांते, उतक्रांत उके, विलास डोंगरे, प्रफुल्ल ठाकरे,जि.प. सदस्य जियालाल पंधरे, एस. यू. वंजारी, मुख्याध्यापक शरद उपलपवार, डी.टी. कावळे, विरेद्र कटरे, हरिराम येळणे, के.जी. नागपुरे, संतोष कुसराम, वाय.के. सलामे, रामेश्वर बहेकार, एस.सी. हुड्डा, एस.टी. लिल्हारे, आर.एच. मात्रे, पी.बी. बरेकर, संजय बावनकर यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Teacher Bharati teacher take up the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.