अपप्रचारातून राज्याची बदनामी करणाऱ्यांना धडा शिकवा

By Admin | Updated: October 6, 2014 23:15 IST2014-10-06T23:15:19+5:302014-10-06T23:15:19+5:30

लोकसभा निवडणुकीत मला पराभव स्वीकारावा लागला, तरीही मी आपणासमोर आहे. ज्यांना आपण विजयी केले ते तर अदृश्य झाले आहेत. मी लोकांशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी निवडणूक लढवितो.

Teach a lesson to the slanderers of the state from the uprooting | अपप्रचारातून राज्याची बदनामी करणाऱ्यांना धडा शिकवा

अपप्रचारातून राज्याची बदनामी करणाऱ्यांना धडा शिकवा

प्रफुल्ल पटेल : केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी काय केले?
गोंदिया : लोकसभा निवडणुकीत मला पराभव स्वीकारावा लागला, तरीही मी आपणासमोर आहे. ज्यांना आपण विजयी केले ते तर अदृश्य झाले आहेत. मी लोकांशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी निवडणूक लढवितो. अपप्रचार करून नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी नाही, असे सांगून अपप्रचारातून महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले.
रविवारी गोंदिया तालुक्याच्या धापेवाडा, दासगाव, तसेच तिरोडा तालुक्याच्या मुंडीकोटा, अर्जुनी येथे आयोजित सभांमध्ये ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत लोकांची दिशाभूल करणारे आता गायब झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विकासाची कोणती कामे त्यांनी केली? केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी किती नागरिकांच्या समस्या सोडविल्या, याचा विचार आपण केला पाहिजे.
विधानसभा निवडणुकीतसुध्दा अपप्रचार करुन महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केल्या जात आहे, असे खा.पटेल म्हणाले. अदाणी, भेल यासारखे प्रकल्प, धापेवाडा, बावणथडी यासारखे सिंचन प्रकल्प माझ्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित आघाडी सरकारने मंजूर केले. उन्नती, प्रगती व विकासासाठी, धर्मनिरपेक्ष सरकारसाठी राष्ट्रवादी उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

Web Title: Teach a lesson to the slanderers of the state from the uprooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.