कर वसुली चार कोटींच्या घरात

By Admin | Updated: April 1, 2016 02:03 IST2016-04-01T02:03:21+5:302016-04-01T02:03:21+5:30

मागील वर्षी नगर परिषदेने ५० टक्के कर वसुली करून ‘रेकॉर्ड ब्रेक’ केला होता. यंदा मात्र आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत

Tax collections in four crores house | कर वसुली चार कोटींच्या घरात

कर वसुली चार कोटींच्या घरात

३१ तारखेला २५ लाखांची वसुली : दोन दिवसात आकडा आणखी वाढणार
गोंदिया : मागील वर्षी नगर परिषदेने ५० टक्के कर वसुली करून ‘रेकॉर्ड ब्रेक’ केला होता. यंदा मात्र आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ५० टक्केपर्यंत वसुली होऊ शकली नाही. तरीही चार कोटींच्यावर वसुली झाल्याची माहिती आहे. कर वसुली विभागाकडून वसुलीचे काम अजूनही जोमात सुरू असून ही वसुली ३१ मार्चमध्येच टाकली जाणार असल्यामुळे ५० टक्के वसुलीचा आकडा गाठण्यात किती यश येते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मागील वर्षी नगर परिषदेने कं बर कसून कर वसुलीची मोहीम राबविली होती. अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच कर वसुलीच्या कामात हिरीरीने लागले होते. याचे फलीतही तसेच मिळाले व नगर परिषदेने ५० टक्के कर वसुली करून दाखविली. पालिकेच्या इतिहासात एवढी वसुली पहिल्यांदाच झाली असावी. यंदा मात्र कर वसुली विभाग कोठेतरी कमकुवत दिसून येत आहे. मागील वर्षी ११ कोटींचे टार्गेट असताना उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली होती. यंदा नऊ कोटी ५० लाखांचे टार्गेट असताना विभाग मात्र कमी पडत आहे.
५० टक्के कर वसुलीचे टार्गेट सर करण्यासाठी पालिकेला यंदा चार कोटी ७५ लाखांची कर वसुली करणे गरजेचे झाले आहे. मात्र आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत पालिकेची चार कोटींच्या वर कर वसुली झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पालिकेला आणखी ७५ लाख रूपयांची वसुली करणे गरजेचे आहे. हे सुद्धा शक्य होऊ शकते कारण शासकीय कार्यालयांकडून मोठी कर वसुली होणे बाकी असल्याची माहिती आहे. असे झाल्यास मागील वर्षीप्रमाणे यंदाही ५० टक्के कर वसुलीचे टार्गेट सर करता येऊ शकते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Tax collections in four crores house