विकासकामांना पालिकेकडून अडविण्याचे कार्य

By Admin | Updated: August 24, 2016 00:09 IST2016-08-24T00:09:05+5:302016-08-24T00:09:05+5:30

गोंदिया शहराला नंबर १ करण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न अविरत सुरू आहेत.

The task of blocking development works from the corporation | विकासकामांना पालिकेकडून अडविण्याचे कार्य

विकासकामांना पालिकेकडून अडविण्याचे कार्य

गोपालदास अग्रवाल : रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
गोंदिया : गोंदिया शहराला नंबर १ करण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न अविरत सुरू आहेत. विकासाच्या या युद्धात आमचे विरोधी आमच्या गतीने चालू शकत नसल्याने त्यांनी आमच्या प्रयत्नांनी मंजूर शहराच्या अनेको योजनांना अडविण्याचे कार्य केले जात असल्याचा आरोप आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला.
आमदार अग्रवाल यांच्या स्थानिक विकास निधीतून कन्हारटोली परिसरात मंजूर १० लाख रूपयांच्या रस्ता सिमेंटीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी शनिवारी (दि.२०) ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ सामाजीक कार्यकर्ता चंद्रकुमार बडवाईक होते. याप्रसंगी कॉंग्रेस कमिटी जिल्हा महासचिव अमर वऱ्हाडे, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी, अल्पसंख्यक सेल जिल्हाध्यक्ष जहीर अहमद यांनी आपले विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक नगरसेवक व्यंकट पाथरू यांनी मांडले. संचालन करून आभार शहर महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला युवक कॉँग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, एनएसयुआय अध्यक्ष अजय संदीप रहांगडाले, बाबूराव पिल्लारे, ओमी बग्गा, अजय तुरकर, मद्रिकाप्रसाद तिवारी, धनराज उके, चेतना पराते, अजय गौर, बलजीतसिंग बग्गा, निर्मल अग्रवाल, अजीत गांधी, हरिश तुळसकर, गणेश लिल्हारे, प्रकाश राठोड, कामाक्षी बडवाईक व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The task of blocking development works from the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.