शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
5
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
6
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
7
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
8
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
9
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
10
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
11
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
12
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
13
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
14
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
15
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
16
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

टार्गेट २७६ कोटीचे वाटप केवळ ९८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:38 IST

खरीप हंगामाला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्ज न मिळाल्याने शेतीची कामे सोडून बँकाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे. जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकाना एकूण २७६ कोटीचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते.

ठळक मुद्देपीक कर्ज वाटप : राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर, किचकट प्रक्रियेने शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामाला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्ज न मिळाल्याने शेतीची कामे सोडून बँकाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे. जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकाना एकूण २७६ कोटीचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ९ जुलैपर्यंत केवळ ९८ कोटी २७ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप झाले. त्यावरुन पीक कर्ज वाटपात बँका फार माघारल्याचे चित्र आहे.खरीप हंगामाच्या पूर्वी शेतकऱ्यांना खते, बियाणे खरेदी करता यावी, यासाठी शासनाने एप्रिल महिन्यापासूनच पीक कर्जाचे वाटप सुरू करण्याचे निर्देश बँकाना दिले होते. जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकांना एकूण २७६ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. मात्र खरीप हंगामाला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटत असताना जिल्हा बँकेने ६८ कोटी ४७ लाख रुपये तर राष्ट्रीयकृत बँकानी ३० कोटी रुपये अशा एकूण ९८ कोटी २७ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे ९ जुलैपर्यंत वाटप केले आहे.बँकाना दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत अर्ध्या पीक कर्जाचे सुध्दा वाटप करण्यात आले नाही. पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकानी पीक कर्ज मेळाव्यांचा मोठा गाजावाजा केला. मात्र यानंतरही या बँकानी १७० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यावरुन या बँकामधून शेतकºयांना किती पीक कर्ज मिळाले असेल याची कल्पना न केलेली बरी. जिल्ह्यात ३ लाखांवर शेतकरी असून खरीपात १ लाख ८९ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. तर शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा घोळ अद्याप संपला नसल्याने शेतकऱ्यांकडे खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी पैशाची चणचण होती. हीच अडचण लक्षात घेवून शासनाने सर्व बँकाना एप्रिल महिन्यापासून पीक कर्ज वाटपाचे निर्देश दिले होते. मात्र जिल्हा बँक वगळता राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज वाटपात फारच पिछाडीवर आहेत.बँकेच्या चकरा मारुन शेतकरी त्रस्तराष्ट्रीयकृत बँकांमधून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारच किचकट आहे. या बँकाकडून विविध कागदपत्रांची मागणी करुन पीक कर्ज देण्यास विलंब केला जातो. खरीप हंगामाला सुरूवात होवून सुध्दा या बँकामधून पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतीची कामे सोडून शेतकऱ्यांना बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे.आदेश देऊन प्रशासन मोकळाजिल्हा प्रशासनाने जिल्हा व राष्ट्रीयीकृत बँकाना एकूण २७६ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. मात्र बँकानी मागील तीन महिन्यात केवळ ९८ कोटी २७ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. दिलेल्या उद्दिष्टापैकी अर्धे उद्दिष्ट सुध्दा बँकानी पूर्ण केले नाही. मात्र यासर्व प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पीक कर्ज वाटपाचे आदेश देऊन धन्यता मानल्याचे चित्र आहे.