१४ हजार शौचालयांचे लक्ष्य

By Admin | Updated: December 6, 2015 01:54 IST2015-12-06T01:54:41+5:302015-12-06T01:54:41+5:30

शौचालयाअभावी रस्त्यावर किंवा खुल्या जागेत शौच करणाऱ्या गरिबांना शासनाने स्वच्छ भारत मिशन या अभियानातून शौचालय बांधून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

Target of 14 thousand toilets | १४ हजार शौचालयांचे लक्ष्य

१४ हजार शौचालयांचे लक्ष्य

नरेश रहिले गोंदिया
शौचालयाअभावी रस्त्यावर किंवा खुल्या जागेत शौच करणाऱ्या गरिबांना शासनाने स्वच्छ भारत मिशन या अभियानातून शौचालय बांधून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यातील १४ हजार १३१ कुटुंबासाठी शौचालय यावर्षी तयार करण्याचे ठरविले आहे. मार्चअखेरपर्यंत हे उद्दिष्टे पूर्ण केले जाणार आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद तर्फे सर्व ग्राम पंचायतींच्या माध्यमातून शौचालय तयार करण्याचे काम केले जात आहेत. आमगाव तालुक्यात एपीएलचे ४६७ व बीपीएलचे ८३५ असे एकूण १३०२ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एपीएलचे ५६९ व बीपीएलचे २९४ असे एकूण ८६३ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. गोंदिया तालुक्यात एपीएलचे ५४३ व बीपीएलचे ३३५ असे एकूण ८७८ शौचालय तयार करण्यात येणार आहेत.
गोरेगाव तालुक्यात एपीएलचे १५९३ व बीपीएलचे १२१५ असे एकूण २८०८ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात एपीएलचे ५७२ व बीपीएलचे ७८३ असे एकूण १३५५ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. सालेकसा तालुक्यात एपीएलचे ९४३ व बीपीएलचे ३३६ असे एकूण १२७९ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. तिरोडा तालुक्यात एपीएलचे १५२४ व बीपीएलचे १२९३ असे एकूण २८१७ शौचालय तयार करण्यात येणार आहेत.
देवरी तालुक्यात एपीएलचे १३३७ व बीपीएलचे १४९२ असे एकूण २८२९ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एपीएलचे ७५४८ व बीपीएलचे ६५८३ असे एकूण १४ हजार १३१ शौचालय तयार करण्यात येणार आहेत.

Web Title: Target of 14 thousand toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.