तंटामुक्त समितीने लावला प्रेमीयुगुलाचा विवाह

By Admin | Updated: September 14, 2015 01:41 IST2015-09-14T01:41:24+5:302015-09-14T01:41:24+5:30

स्थानिक ग्रामपंचायतीच्या सभागृहात महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या मासिक सभेत शुक्रवार (दि.११) दुपारी १२ वाजता एका प्रेमीयुगुलाचा विवाह सोहळा पार पाडण्यात आला.

Tantakukta committee ke lover lamayugula marriage | तंटामुक्त समितीने लावला प्रेमीयुगुलाचा विवाह

तंटामुक्त समितीने लावला प्रेमीयुगुलाचा विवाह

रावणवाडी : स्थानिक ग्रामपंचायतीच्या सभागृहात महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या मासिक सभेत शुक्रवार (दि.११) दुपारी १२ वाजता एका प्रेमीयुगुलाचा विवाह सोहळा पार पाडण्यात आला.
गावातील ध्रुव नागोराव राऊत व कविता फुलचंद नेवारे या दोघांमध्ये मागील सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या कुटुंबीयांमध्ये परस्पर मतभेद निर्माण झाल्यामुळे सदर प्रेमीयुगुलाचा वाद स्थानिक तंटामुक्त समितीसमोर आले. या वेळी समितीने दोन्ही पक्षांमध्ये समजूत घालून दोन्ही पक्षांच्या आपसी समन्वयाने त्या प्रेमीयुगुलाचा विवाह दुर्गा मातेच्या मंदिरात पार पाडण्यात आला.
याप्रसंगी गावातील गणमान्य व्यक्तिंसह तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देवराज मेश्राम, सरपंच सुजित येवले, उपसरपंच कैलाश कुंजाम, आनंद लांजेवार, महेश चौधरी, हिवराज लिल्हारे, पोलीस पाटील कृष्णगोपाल उईके, बाबुलाल हरिणखेडे, दिनेश हरिणखेडे, दिलीप वासनिक, सुरेखा बिसेन, कल्पना लिल्हारे, सरिता न्यायकरे, मनूलता जौंजाळ, ललिता गजभिये, संपता चंदेल, तंमुस सदस्य सोगण पारधी, मानिक उके, मेघराज हरिणखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Tantakukta committee ke lover lamayugula marriage