विविध ठिकाणी तान्हा पोळा उत्साहात

By Admin | Updated: September 5, 2016 00:22 IST2016-09-05T00:22:18+5:302016-09-05T00:22:18+5:30

शेतकऱ्याचा खरा मित्र व सुख-दु:खाचा सोबती म्हणून ओळख असलेल्या बैलांचा सण पोळा जिल्ह्यात सर्वत्र थाटात साजरा करण्यात आला.

Tana Pao enthusiast in different places | विविध ठिकाणी तान्हा पोळा उत्साहात

विविध ठिकाणी तान्हा पोळा उत्साहात

गोंदिया : शेतकऱ्याचा खरा मित्र व सुख-दु:खाचा सोबती म्हणून ओळख असलेल्या बैलांचा सण पोळा जिल्ह्यात सर्वत्र थाटात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे शाळांत चिमुकल्यांनी तान्हा पोळा साजरा करून आपल्या परंपरांची माहिती जाणून घेतली.
गोवर्धन चौक, छोटा गोंदिया
गोंदिया : छोटा गोंदिया येथील गोवर्धन चौकात युवा अर्जुन ग्रुप तर्फे डॉ.एन.जे.गलोले यांच्या स्मृतीत उत्कृष्ट बैलजोडींना पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाला नगरसेवक विष्णु नागरीकर, संस्थाध्यक्ष राजेश गलोले, पप्पू बिसेन, किसन भगत, वेनेश्वर पंचबुध्दे, श्रावण भगत, महादेव आमकर, जितेंद्र गलोले उपस्थित होते. यावेळी दिलीप कटरे, अनिल बनकर, केशोराव टेंबरे, बाबु कटरे, छोटू नागरीकर या शेतकऱ्यांच्या जोडीला सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी सुभाष कडव, ओंकार मदनकर, कारू सोनवाने, रामलाल मटाले, वसंत मारवाडे, रवी नेवारे, श्याम चौरे, मुलचंद किरणापुरे, लोकेश पटले, बेबी नागरीकर, लोकेश बुध्दे, विरेंद्र सिंगनजुडे, जितू देशकर, बालु भुते, सतीश गलोले, कैलाश शेंडे, कुंदन नागरीकर यांनी सहकार्य केले.
राष्ट्रीय चौक, कुडवा
गोंदिया : राष्ट्रीय चौकात तान्हा पोळ्यानिमित्त नंदी सजावट व नंदी दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ४५ बालकांनी भाग घेतला. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बालकांना पेन्सील,रबर, व पेन वाटप करण्यात आले. उद्घाटन माजी जि.प.सदस्य बाळकृष्ण पटले यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच शैलेंद्र वासनिक, रमेश कुमार गौतम, भास्करराव डबरे, दामोदर बांडेबुंचे, देवानंद बावनथडे, भुरणलाल पारधी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तुळसीराम बांडेबुचे, नितीन डबरे, हेमराज बांडेबुचे, महेश बांडेबुचे, सत्यजीत उके, संतोष बांडेबुचे, रुपेश मेश्राम, अनुराग बांडेबुचे, रुपचंद गौतम, संजय फरदे यांनी सहकार्य केले.
मदर टेरेसा शाळा
एकोडी : येथील सेंट मदर टेरेसा नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये तान्हा पोळा मुख्याध्यापिका शुभांगी पारधी यांच्या अध्यक्षतेत साजरा करण्यात आला.
यावेळी रेखा रहांगडाले यांनी पोळ्याचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीस व चॉकलेट वितरण करण्यात आले.
ज्ञानदीप कॉन्व्हेंट
अर्जुनी-मोरगाव : स्थानिक सरस्वती ज्ञानदिप कॉन्व्हेंटमध्ये तान्हा पोळयाचे आयोजन करण्यात आले. नर्सरी ते केजी पर्यंतच्या बालगोपालांनी विविध वेशभूषेत नंदी सजवून सहभाग घेतला.
५० च्या वर विद्यार्थी सहभागी झाले होते. उत्कृष्ट वेशभूषा व नंदी सजावटसाठी प्रथम पुरस्कार अश्लेषा ब्राम्हणकर, ओजस भुतडा, द्वितीय पुरस्कार वत्सल भेंडारकर, अगस्त कापगते, तृतीय पुरस्कार मृन्मयी खोब्रागडे, अवनी भट्टड, मंथन यावलकर, आदीत्या भेंडारकर यांंना देण्यात आले. पुरस्कार वितरण पर्यवेक्षीका विना नानोटी, सुनिता डांगे, मुख्याध्यापिका सरीता शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्राम मैताखेडा
बोरगाव : मैताखेडा येथे पोळा साजरा करण्यात आला. यावेळी मदन राऊत, शामराव मसे, धनीराम मानकर,धनलाल गावळ, काशीराम शहारे, प्रंशात, सुरेश व सर्व पुरूष-महिला उपस्थित होते.
धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट
देवरी : माँ धुकेश्वरी मंदीर ट्रस्टच्या वतीने जि.प.हायस्कूलच्या मैदानावर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रंगबिरंगी रंगानी बळीराजाने आपले बैल सजवून आणले होते. त्यात उत्कृष्ट बैलजोडीला रोख रक्कमेचे पारितोषीक देण्यात आले.
अध्यक्षस्थानी ठाणेदार राजेश तटकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून सहषराम कोरोटे, प्रशांत संगीडवार, सुरेंद्र महाराज, ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अतिथीच्या हस्ते बैलजोडीची पूजा करून उत्कृष्ट बैलजोडीकरीता लक्ष्मण ताराम, सीताराम मानकर व मनोज वाडगुरे यांना पुरस्कार देण्यात आले. पोळा फुटल्यानंतर बैलजोडी व शेतकऱ्यांचे घरोघरी स्वागत करून पूजा अर्चना व बैलांना पुरणपोळीचे जेवन देण्यात आले.
दुसऱ्या दिवशी मारबत व तान्हा पोळा साजरा करण्यात आला. तरूण पंचशील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोनूशाह यांच्या मार्गदर्शनात डीजे व ढोल ताशांच्या गजरात मारबतची मिरवणू काढली.
सायंकाळी धुकेश्वरी मंदीर व सुरभी चौक शिव मंदिराजवळ तान्हा पोळयाचे आयोजन करण्यात आले. शिवमंदिराजवळील तान्हा पोळ्यात लहान मुलांकरीता व महिलांकरीता धावण्याची स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. विजयी स्पर्धकांना वार्डातील जेष्ठ महिलांच्या हस्ते शालेय उपयोगी वस्तू भेटस्वरूप देण्यात आले.
तान्हा पोळा उत्सव समिती,सरांडी
तिरोडा : तालुक्यातील ग्राम सरांडी येथील तान्हा पोळा उत्सव समितीच्यावतीने गांधी चौकात तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर लहान बालगोपालांनी नंदी बैल आणलेले होते. सर्व नंदी आणणाऱ्या बालकांचे स्वागत पं.स.सभापती उषा किंदरले यांनी केले. सोबत पं.स.सदस्य जया धावडे, सरपंच शोभा कांबळे, कौशल्या वाणी, मानिक बदने, वासुदेव ढेंगे, पोलीस पाटील रामकृष्ण लांजेवार, दिगंबर शेंडे, सुखदेव साठवणे, विनोद धावडे, अरूण गणेवार, शैलेश बांगरे, निखाडे, मानिक वाणी उपस्थित होते.
याप्रसंगी जि.प.पू.मा.शाळा, प्रगती आश्रम शाळा, एस.एन.ज्युनिअर कॉलेज व प्रगती हायस्कूल सरांडी या चार शाळेतील ९ विद्यार्थ्यांचा पालकासह माजी आ. दिलीप बंसोड यांच्या अध्यक्षतेत उषा किंदरले, संदीप कोळी, उजवणे, मनोज डोंगरे यांनी सत्कार केला. प्रास्ताविक मुख्याध्यापक रामसागर धावडे यांनी मांडले. संचालन यशवंत दमाहे यांनी केले.
जिल्हा परिषद शाळा, बिरसी
आमगाव : शाळेचे मुख्याध्यापक एल.यु.खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेत शाळेत तान्हा पोळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजकुमार चौधरी, शाळेचे शिक्षक विकास लंजे, वर्षा बावनथडे यांनी मोलाची माहिती दिली.
पोळानिमित्त नंदी दौड, नंदी सजविणए व वेगळ लावणे या स्पर्धा घेण्यात आल्या. पश्चात सर्वांना प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संचालन करून आभार शिक्षिका पूनम राठोड यांनी मानले.
शारदा चौक, निमगाव
निमगाव : येथील शारदा चौकात तान्हा पोळा थाटात साजरा करण्यात आला. यात सुमारे २६० बालगोपालांनी आपल्या नंदीसोबत सहभाग घेतला होता.
या तान्हा पोळ्यामध्ये ६ नंदीना बक्षीस वितरण करण्यात आले. तर ११ नंदीना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. या तान्हा पोळ्यामध्ये गावातील नागरिक महिला तसेच तरूण वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. (ठिकठिकाणच्या वार्ताहराकडून)

Web Title: Tana Pao enthusiast in different places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.