कनेरीत घेतली आढावा सभा
By Admin | Updated: May 16, 2016 02:00 IST2016-05-16T01:58:46+5:302016-05-16T02:00:33+5:30
कनेरी या गावाला आदर्श करण्याकरिता प्रत्येक बाबतीत तांत्रिकदृष्ट्या विचार करून व भविष्याचा वेध घेऊन काम करण्याचे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

कनेरीत घेतली आढावा सभा
२९५ शोषखड्डे तयार होणार : नागरिकांसाठी विविध उपक्रम
गोंदिया : कनेरी या गावाला आदर्श करण्याकरिता प्रत्येक बाबतीत तांत्रिकदृष्ट्या विचार करून व भविष्याचा वेध घेऊन काम करण्याचे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. शुक्रवारी कनेरी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते.
गावात पिण्याचे शुध्द पाणी, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना ई-लर्निंगची अत्याधुनिक सुविधा, वाचनालय, अत्याधुनिक ग्रामपंचायत, महिला व पुरूषांचे स्वयंपूर्ण बचत गटातून आर्थिक विकास, कौशल्य विकासाकरिता प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीत गावकऱ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. याकरिता ग्रामपंचायत सहकार्य करीत आहे. यावेळी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती कविता रंगारी, सरपंच इंदू मेंढे, खंडविकास अधिकारी झामसिंग टेंभरे, उपसरपंच प्रेमराज मेंढे, पं.स. सदस्य राजेश कठाणे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत धमगाये, उपविभागीय अभियंता देशमुख, शाखा अभियंता अगळे, वसंत गहाणे, ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन भेंडारकर, चंद्रकुमार खोटेले, शिशुकला तवाडे, सरिता वैद्य, कोकिळा मेंढे, सचिव सी.जी. बागडे उपस्थित होते.
आढावा घेताना त्यांनी, गावकऱ्यांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्या याकरिता ग्रामपंचायत इमारत सुसज्ज व्हावी या करीता नवीन इमारत बांधकामाचा व आवश्यक सर्व बाबींचा प्र्रस्ताव सादर करण्यासंदर्भात निर्देश दिले.
यावेळी खंडविकास अधिकारी टेंभरे यांनी, गावात झालेल्या कार्याचा अहवाल सादर करीत गावात बेसलाईन सर्वेनुसार १०० टक्के शौचालय बांधकाम झाल्याचे सांगून, नांदेड पॅटर्ननुसार २९५ कुटुंबाला शोषखड्ड्यांची प्रशासकीय मान्यता मिळाली. ६५ शोषखड्डे तयार झाले असल्याची माहिती दिली. गावात ४२ लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. १० लाखांचे सिमेंट रस्ता बांधकाम झाले आहे. २० लाखांचा बंधारा बांधकाम सुरू आहे. २० लाख खर्च करून मग्रारोहयो अंतर्गत गाव तलाव खोलीकरणाचे काम व नाला सरळीकरणाचे काम सुरू आहे. वाचनालयाची इमारत मंजूर झाली, ७१५ नागरिकांचे जनधन खाते असून विमा योजनेत सहभागी झाले आहेत. गावात आरोग्य शिबिर घेण्यात आले आहे.
या शिबिरात ५०३ नागरिकांची वेगवेगळी तपासणी करण्यात आली. महात्मे नेत्र पेढीकडून झालेल्या नेत्र तपासणी शिबिरात ९२ लोकांची तपासणी करण्यात आली. ३२ लाभार्थी चष्म्यासाठी पात्र ठरले. समाधान शिबिरातून जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, अधिवास दाखले देण्यात आले. रक्तदान तपासणी शिबिरात रक्त तपासणी करण्यात आली. शेतकऱ्यांना व्यावसायिक कृषीसंदर्भात मार्गदर्शन व प्रेरणा मिळावी या उद्देशाने कृषी सहल आयोजित करण्यात आली.
वनहक्काचे ७६ दावे तयार करून तहसील कार्यालयात सादर करण्यात आले. शेणखतासाठी नाडेफ अंतर्गत १५ बांधकाम करण्यात आहे. महिला बचत गटांना सक्षमीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले. वांझ जनावरांकरिता आयोजित पशुचिकित्सा शिबिरात १२९ जनावरांची तपासणी करण्यात आली आली. संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून देत असल्याचे सांगितले. संचालन करून आभार सचिव बागडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)