अनागोंदी कारभाराची फेरचौकशी करा
By Admin | Updated: March 10, 2016 02:35 IST2016-03-10T02:35:04+5:302016-03-10T02:35:04+5:30
गोंदिया तालुक्या येणाऱ्या धामनगाव येथील सरपंच व सचिवांनी परस्पर संगनमत करून अनेक विकास कामांत मोठ्याने भ्रष्टाचार केला,

अनागोंदी कारभाराची फेरचौकशी करा
रावणवाडी : गोंदिया तालुक्या येणाऱ्या धामनगाव येथील सरपंच व सचिवांनी परस्पर संगनमत करून अनेक विकास कामांत मोठ्याने भ्रष्टाचार केला, अशी ओरड अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र हवी तशी या प्रकरणाची चौकशी होत नसल्यामुळे प्रशासनाविरोधात गावकऱ्यांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे.
गावकऱ्यांच्या वतीने अनेक तक्रारी संबंधित विभागासमक्ष करण्यात आल्या. मात्र संबंधित विभाग भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे ९ फेब्रुवारीला भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकारी जागे झाले. प्रकरणाच्या चौकशीकरिता पटले आणि पराते या दोन विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी प्रकरणाची चौकशी न करता सरपंच व सचिव यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचविण्याचाच प्रयत्न केला, अशी चर्चा गावात होत आहेत.
बोगस मजुरांच्या नावे मजुरीचा मोबदला काढण्यात आला. याबाबत विचारणा करावयास गेलेल्या खऱ्या मजुरांना सरपंच व सचिव यांनी अरेरावी वागणूक करून त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. उडवाउडवीचे उत्तर ऐकून गावकऱ्यांनी मजुरांसोबत या भ्रष्टाचाराच्या चौकशीकरिता वरिष्ठांना तक्रार करून सखोल चौकशीची मागणी केली. मात्र चौकशी थातूरमातूर करून सरपंच, सचिवांना मोकळे करण्यात आले. सध्याचे ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच विश्राम कावरे हे व्यक्ती कधीच कोणत्याही कामावर जात नसले तरी त्यांच्याही नावे कामे केल्याचा परिश्रमीक मोबदला काढण्यात आला. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी काहीच कामे न करता कामाचा मोबदला काढून खऱ्या मजुरांना मोबदला देण्याचे नाकारले. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर मोठ्याने भ्रष्टाचार होत असल्याचा संशय मजुरांमध्ये निर्माण झाला. याबाबद चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मजुरांनी वारंवार केली. त्यावर चौकशीचे काम ग्रामविस्तार अधिकारी पटले आणि पराते यांच्यावर सोपवण्यात आले. मात्र त्यांनी चौकशी कमी आणि सरपंच-सचिवाची पाठराखण अधिक केल्यामुळे मजुरांवर न्यायापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.
मजुरांची चौकशी, तक्रार करण्याऱ्यांची चौकशी असा दहशतीचा मार्ग अवलंबून स्वत:च्या मर्जीने मजुरांचे बयान नोंदवून त्यांचा स्वाक्षऱ्या करवून घेतल्या. तसेच झालेल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचे कार्य करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची दुबार चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मजूर वर्गाकडून होत आहे. (वार्ताहर)
बोगस मजुरांच्या नावे काढली मजुरी
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या पांदण रस्ता, स्मशान रस्त्यावर मुरूम घालण्याच्या कामात मोठ्याने भ्रष्टाचार झाला. मुरूम पसरविण्याचे काम वृक्षारोपण करणाऱ्या मजुरांकडून करण्यात आला. ते काम मस्टर रोलमध्ये बोगस मजुराची नोंद करून त्यांचा नावे मोबदला काढण्यात आला. माजी सरपंच दौलत कावरे, सध्या ग्रामपंचायत सदस्य असून त्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे बोगस परिश्रमीक मोबदला काढून तो बँकेतही जमा झाला. ती रक्कम काढण्यातही आली. हा प्रकार बघून वृक्षारोपणाच्या कामावर असणाऱ्या मजुरांनी काम करून मोबदला दुसऱ्यांच्या नावे कसा काढण्यात आला, याबाबद ग्रामपंचायतचे सचिव यांना विचारपूस करण्यात आले. मात्र सरपंच, सचिवाकडून एकच जवाब देण्यात आला की, हे संपूर्ण काम याच मजुरांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्याच नावाने परिश्रमीक मोबदला निघाला.