नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करा
By Admin | Updated: May 3, 2016 02:04 IST2016-05-03T02:04:56+5:302016-05-03T02:04:56+5:30
पालकमंत्री राजकुमार बडोले हे रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी गोरेगाव तालुक्यातील डव्वा, सटवा,

नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करा
गोंदिया : पालकमंत्री राजकुमार बडोले हे रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी गोरेगाव तालुक्यातील डव्वा, सटवा, गणखैरा व दवडीपार या गावातील नैसिर्गक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या घरांची व शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांना व कुटुंब प्रमुखांना धीर दिला. झालेल्या नुकसानीची माहिती नुकसानग्रस्तांकडून जाणून घेतली.
२७ एप्रिलच्या रात्री आलेल्या वादळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील अनेक गावातील घरांचे व शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. पालकमंत्र्यांनी २८ एप्रिल रोजीच जिल्हा प्रशासनला झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने त्यांनी रविवारी नुकसानग्रस्त डव्वा येथील श्यामराव मेश्राम व सुमेंद्र कटरे, सटवा येथील पुरणलाल ठाकुर, गणखैरा येथील नुखलाल पारधी यांच्या नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली.
सटवा येथील शेतकरी मोडकू बघेले, दवडीपार येथील शेतकरी भाकचंद कटरे यांच्या नुकसान झालेल्या धान पिकाच्या शेतीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी शेतीच्या व घराच्या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करावे, त्यामुळे नुकसानग्रस्तांना शक्य तेवढ्या लवकर मदत करता येईल असे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना सांगीतले.
नुकसानग्रस्त गावांची पाहणी करतांना पालकमंत्र्यांसोबत आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी हरिणखेडे, पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी, जिल्हा परिषद सदस्य वरखेडे, सटवा सरपंच रमेश ठाकूर, पोलीस पाटील टिकाराम रहांगडाले, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ.के.टी. कटरे, माजी सरपंच महादेव वाणे, भागचंद रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
गोंदिया, गोरेगाव, तिरोडा व आमगाव तालुक्याला फटका
४२७ एप्रिल रोजी आलेला वादळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील २२ गावांतील ९२१ घरांचे ४७ लाख ३४ हजार रु पयांचे नुकसान तर ३१८ हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाले. गोंदिया तालुक्यातील १८ गावातील ९६ घरांचे व २० हेक्टर शेतीचे, तिरोडा तालुक्यातील ३ गावांतील १४ घरांचे आणि आमगाव तालुक्यातील ३४ घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.