बाबासाहेबांचे विचार रुजवून समाजाची धुरा सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST2021-02-08T04:25:42+5:302021-02-08T04:25:42+5:30
बाराभाटी : आपला समाज वर्गणी जमा करून संघटित होण्यासाठी धडपड करतो. या कामासाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मुक्त केले आणि ...

बाबासाहेबांचे विचार रुजवून समाजाची धुरा सांभाळा
बाराभाटी : आपला समाज वर्गणी जमा करून संघटित होण्यासाठी धडपड करतो. या कामासाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मुक्त केले आणि तथागतांचा धम्म देऊन जनमाणसाचा उद्धार करा, असा संदेश दिला. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरात रुजवून समाजाची धुरा उत्तमरीत्या सांभाळा, असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
जवळील ग्राम चान्ना येथील आनंद बुद्ध विहारात शनिवारी (दि.६) तथागत बुद्ध मूर्ती अनावरण व प्रबोधन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, माजी उपाध्यक्ष रचना गहाणे, लायकराम भेंडारकर, आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत प्रा.मुन्नाभाई नंदागवळी, गजानन डोंगरवार, प्रभाकर दहीकर, रघुनाथ लांजेवार, मोरेश्वर सोनवाने, देवका मरस्कोले, व्यकंट खोब्रागडे, भोजराम लोगडे, पंढरी लोगडे, अंताराम राखडे, राजन बोरकर, डाॅ.श्वेता कुलकर्णी, नारनवरे उपस्थित होते. प्रास्ताविक तुलाराम शेंडे यांनी मांडले. संचालन तुलसीराम शेंडे यांनी केले. आभार भोजराम डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी रामचंद्र हुमणे, नाना रामटेके, लखन खोब्रागडे, रघुनाथ शेंडे, युवराज डोंगरे, लेकराम चिमणकर, प्रभूदास रामटेके, चैतराम बारसागडे, जयदेव दिरबुडे, घनश्याम चिमणकर यांनी सहकार्य केले.