जिल्ह्यात एका बाधिताची पडली भर, काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST2021-12-18T05:00:00+5:302021-12-18T05:00:16+5:30
यंदाची दिवाळी कोरोनामुक्त झाली असतानाच त्यानंतरही कोरोना परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, आता हळूवार का असेना कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. १७) जिल्ह्यात १ कोरोना बाधित आढळून आला आहे. यामुळेच आता जिल्ह्यातील गोरेगाव, आमगाव, सालेकसा व अर्जुनी-मोरगाव हे ४ तालुके कोरोना बाधित झाले आहेत. याकडे लक्ष देत आता जिल्हावासीयांनी अधिक खबरदारीने वागणे, नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे.

जिल्ह्यात एका बाधिताची पडली भर, काळजी घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील २-३ दिवसांपासून जिल्ह्यात नवीन बाधितांची भर नसल्याने दिलासा असतानाच शुक्रवारी (दि. १७) गोरेगाव तालुक्यात १ बाधित आढळून आला आहे. यामुळे आता जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ४ इतकी झाली आहे. यानंतर जिल्ह्यातील ४ तालुके कोरोना बाधित झाले असून, वाढती रुग्णसंख्या बघता नागरिकांनी खबरदारीने वागणे गरजेचे आहे. यंदाची दिवाळी कोरोनामुक्त झाली असतानाच त्यानंतरही कोरोना परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, आता हळूवार का असेना कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. १७) जिल्ह्यात १ कोरोना बाधित आढळून आला आहे. यामुळेच आता जिल्ह्यातील गोरेगाव, आमगाव, सालेकसा व अर्जुनी-मोरगाव हे ४ तालुके कोरोना बाधित झाले आहेत. याकडे लक्ष देत आता जिल्हावासीयांनी अधिक खबरदारीने वागणे, नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४१,२३८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, ४०,५२६ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ४ असून, यातील २ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण ९८.६ टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर १.४ टक्के आहे, तर डब्लिंग रेट २९३४.६ दिवस आहे.
आतापर्यंत ४,६९,६९२ चाचण्या
- गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत ४,६९,६९२ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये आरटी-पीसीआरचे २,४५,५८४ नमुने असून, रॅपिड अँटिजन चाचणीचे २,२४,१०८ नमुने आहेत.
सुरक्षेसाठी लस घ्या
- कोरोना लसीपासून संरक्षण मिळत असतानाही आतापर्यंत अनेकानी लस घेतलेली नाही, तर कित्येकांनी दुसरा डोस टोलवला आहे. मात्र, कोरोनापासून संरक्षणासाठी लस हेच एकमात्र कवच असल्याने लसीकरणासाठी शासन व प्रशासनाकडून धडपड सुरू आहे. अशात नागरिकांनी लवकर लस घेणे गरजेचे आहे.