धानाच्या पुंजाण्याला आग लावणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 06:00 AM2019-12-09T06:00:00+5:302019-12-09T06:00:13+5:30

धानाच्या नुकसानाची पाहणी करुन शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे व नुकसानीचा पंचनामा करून त्वरित मदत देण्याच्या सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जि.प. कृषी सभापती शैलजा सोनवाने यावेळी उपस्थित होत्या.

Take action on those who set the paddy field on fire | धानाच्या पुंजाण्याला आग लावणाऱ्यांवर कारवाई करा

धानाच्या पुंजाण्याला आग लावणाऱ्यांवर कारवाई करा

googlenewsNext
ठळक मुद्देविनोद अग्रवाल : शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील काही दिवसांपासून गोंदिया तालुक्यात धानाच्या पुंजण्यांना आग लावण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कामठा येथील नवरगावकला मार्गावरील शेतातील धानाच्या पुंजण्याला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना शनिवारी घडली. याची माहिती मिळताच आ.विनोद अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना धानाच्या पुंजण्यांना आग लावणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाही करण्याचे निर्देश दिले.
धानाच्या नुकसानाची पाहणी करुन शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे व नुकसानीचा पंचनामा करून त्वरित मदत देण्याच्या सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जि.प. कृषी सभापती शैलजा सोनवाने यावेळी उपस्थित होत्या. शेतकरी बांधवाचे नुकसान भरून निघावे म्हणून प्रती शेतकरी २० हजार रुपये नुकसान भरपाई जिल्हा परिषदेकडून मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी कामठाचे सरपंच लिलेश्वर कुंभरे, प्रकाश सेवतकर, सामाजिक कार्यकर्ता विजय लिल्हारे, मिलन पाथोडे, जि.प.सदस्य विजय लोणारे, तलाठी ठाकरे, किशोर लिल्हारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेश मस्करे, प्रभाकर शेंडे, बिट जमादार वरखडे, राधेश्याम मेंढे, ग्रामसेवक प्रमोद मेश्राम, कमलेश सोनवाने आणि शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Take action on those who set the paddy field on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती