क्षमतेपेक्षा अधिक खनिज वाहतूक वाहनांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:37 IST2018-03-29T00:37:08+5:302018-03-29T00:37:08+5:30

शिवसेना तालुका शाखेच्या वतीने क्षमतेपेक्षा अधिक खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवेदन तहसीलदार विजय बोरुडे यांना देण्यात आले.

Take action on more mineral transport vehicles than capacity | क्षमतेपेक्षा अधिक खनिज वाहतूक वाहनांवर कारवाई करा

क्षमतेपेक्षा अधिक खनिज वाहतूक वाहनांवर कारवाई करा

ठळक मुद्देधुळीमुळे डोळ्यांचे आजार: शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन

ऑनलाईन लोकमत
देवरी : शिवसेना तालुका शाखेच्या वतीने क्षमतेपेक्षा अधिक खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवेदन तहसीलदार विजय बोरुडे यांना देण्यात आले.
शासनाच्या रॉयल्टी विना अवैधरित्या क्षमतेपेक्षा जास्त खनिज (मुरुम) वाहतूक करणाºया तीन टिप्पर वाहनाना देवरीचे तहसीलदार बोरुडे यांनी २२ मार्च रोजी पकडले. या तीन टिप्पर वाहनातील दोन टिप्पर वाहन देवरी आमगाव मार्गावरील रस्त्याच्या बांधकामावर शासनाच्या रॉयल्टी विना व क्षमतेपेक्षा जास्त (मुरुम) खनिज वाहतूक करीत असल्याचे आढळले.
या तीन्ही वाहनांची आरटीओ मार्फत चौकशी करुन दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली. देवरी-आमगाव मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम एका कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरु आहे.
या रस्त्यावरील कामावर नियमित पाणी न टाकल्याने आणि क्षमतेपेक्षा जास्त भार असलेल्या वाहनातून खनिज मुरुम आणून टाकली जात आहे. या मार्गावरुन दिवसरात्र धूळ उडत असते.
त्यामुळे परिसरातील नागरिकांना यापासून त्रास होतो. तसेच या कामाकरिता क्षमतेपेक्षा अधिक खनिजाची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे याची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करुन दंडात्मक कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली.
या वेळी तहसीलदार यांनी या तिन्ही वाहनावर ६ लाख ४४ हजार रुपयांचे दंड ठोकून संबधित उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना या वाहनाची खनिज क्षमतेची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. शिष्टमंडळात तालुका प्रमुख सुनील मिश्रा व शहर प्रमुख राजा भाटीया यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Web Title: Take action on more mineral transport vehicles than capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.