कृषी सहायकावर कारवाई करा

By Admin | Updated: June 2, 2016 01:21 IST2016-06-02T01:21:22+5:302016-06-02T01:21:22+5:30

तिरोडा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात भात खाचरच्या कामांसाठी गोरेगाववरून प्रतिनियुक्तीवर आलेले कृषी सहायक नाना ईलमे यांनी ...

Take action on agricultural assistance | कृषी सहायकावर कारवाई करा

कृषी सहायकावर कारवाई करा

काचेवानी : तिरोडा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात भात खाचरच्या कामांसाठी गोरेगाववरून प्रतिनियुक्तीवर आलेले कृषी सहायक नाना ईलमे यांनी विकास कामांच्या नावे भकास काम करून दैनंदिनीमध्ये खोटी माहिती दर्शविली. याची लेखी सूचना तालुका कृषी अधिकारी तिरोडा व गोंदिया यांना देण्यात आली असून त्यांनी विभाग स्तरावर पोलिसांत तक्रार दाखल करावी अन्यथा आम्ही तक्रार नोंदवू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
नाना ईलमे यांनी आली दैनंदिनी मंडळ कृषी अधिकारी व पर्यवेक्षक चोपा यांना सादर केली. यात शेतकऱ्यांच्या शेतात जावून काम करण्यापूर्वी मोजमाप करणे, यंत्रधारकांना कामे समजावणे व नंतर झालेल्या कामाचा शेतकऱ्यासमोर मोजमाप करण्याचे सांगितले आहे. तसेच बरबसपुरा व काचेवानीची कामे मार्चअखेर पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु बाळू पारधी हे कामावर होते. बरबसपुरा गावातील भागरथा भाऊजी चौधरी यांच्या शेतात कामाचे भूमिपूजन सरपंच ममता लिचडे, ग्रामपंचायत सदस्य नरेश असाटी, शिक्षक नेतराम माने, पर्यवेक्षक के.आर. रहांगडाले, कृषी सहायक नागदेवे, शेतकरी शंकर चौधरी यांच्या उपस्थितीत २६ जानेवारीला करण्यात आले. तर काम २९ मार्च ते एप्रिल म्हणजे शून्य महिन्यात करण्यात आले. काही दिवसानंतर एप्रिल महिन्यात कामे करण्यात आले, त्यावे ळी कृषी सहायक नाना एस. ईलमे उपस्थित नव्हते.
ईलमे यांनी काम करताना सरपंच व इतर शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. अनेक शेतात मातीकाम न करता बिल काढण्यात आले. काम केल्यानंतर त्या गटधारक शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणे महत्वाचे होते. परंतु कामाचे मोजमाप केल्याबाबत व काम पूर्ण केल्याबाबत कृषी सहायक ईलमे यांनी स्वाक्षरी घेतली नसून दैनंदिनीमध्ये चुकीचे दर्शविण्यात आले आहे.
एलटीसीचा (महाराष्ट्र दर्शन) लाभ घेणे, घरच्या नोकरी समारंभात नोकरी (कामे) दाखविणे अशा अनेक चुका आहेत. इतर कागदपत्रात चुकीचे अभिलेख जोडून कृषी विभाग, अधिकारी व शासनाची दिशाभूल कृषी सहायक एन.एस. ईलमे यांनी केली आहे. वरिष्ठांनी चौकशी करून गुन्हा नोंदवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Take action on agricultural assistance