जि.प.सदस्य मडावी यांच्यावर कारवाई करा
By Admin | Updated: April 12, 2017 01:15 IST2017-04-12T01:15:56+5:302017-04-12T01:15:56+5:30
जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांच्यावर हल्ला करून...

जि.प.सदस्य मडावी यांच्यावर कारवाई करा
जिल्हा कॉंग्रेस कमिटीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
गोंदिया : जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांच्यावर हल्ला करून त्यानंतर स्वत: त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तक्रार नोंदविणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य सुनिता मडावी यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने केली आहे. यासाठी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना सोमवारी (दि.१०) निवेदन दिले.
कॉंगे्रस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात, सभापती कटरे हे स्वच्छ छवीचे नेता असून यापूर्वीही ते सभापती राहिलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजीत सभेत पिठासीन अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे , मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकूंडवार यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत कटरे यांनी जिल्हा परिषद सदस्य मडावी यांच्या विरूद्ध अयोग्य शब्दाचा प्रयोग केलेला नाही. मात्र सभागृहात झालेल्या प्रकरणानंतर मडावी यांनी कटरे यांच्या विरोधात एट्रॉसिटीच्या खोटी तक्रार देऊन दबाव टाकत आहेत. याचा जिल्हा कॉंग्रेस कमिटीने निषेध व्यक्त केला. विशेष म्हणजे आमदार गोपालदास अग्रवाल यांनीही कॉंग्रेस कमिटीच्या मागणीचे समर्थन केले.
यावर पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी, तक्रारीची चौकशी करून त्यानंतरच योग्य निर्णय घेणार, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.
निवेदन देणाऱ्या प्रतिनिधी मंडळात आमदार अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष मेंढे, उपाध्यक्ष डॉ. झामसिंग बघेले, डॉ. योगेंद्र भगत, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी, जिल्हा महासचिव सहेसराम कोरोटे, अमर वराडे, राजेश नंदागवळी, राधेलाल पटले, संदीप ठाकूर, डेमेंद्र रहांगडाले, जितेंद्र कटरे, संदीप रहांगडाले, आलोक मोहंती, टिनू पटेल, यादनलाल बनोटे, विशाल शेंडे, अरूण दुबे, सुशिल रहांगडाले, व्यंकट पाथरू, मनोज पटनायक, जगदीश येरोला, मनोज वालदे, दिल्लू गुप्ता, राहूल कटरे, सौरभ भेलावे, अमर रंगारी, आनंद बागडे, गेंदलाल कुंभरे, नरेश राऊत, भरत बोरीकर, अॅड.पी.सी.चव्हाण, क्र ांती जायस्वाल, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, निता पटले, निर्मला मिश्रा, रमेश अंबुले, विठोबा लिल्हारे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)