भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा
By Admin | Updated: July 29, 2016 01:52 IST2016-07-29T01:52:45+5:302016-07-29T01:52:45+5:30
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेले भवन पाडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निवेदन ...

भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा
आंबेडकरीबांधवांची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
अर्जुनी-मोरगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेले भवन पाडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निवेदन सोमवारी (दि.२५) उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांना देण्यात आले.
डॉ.आंबेडकरांनी मोठ्या कष्ट व मेहनतीने इमारत उभारली. यातून दलीत बहुजन समाजाचे नष्टचर्य संपविण्यासाठी वैचारिक क्रांतीची सुरूवात करण्यात आली, बुध्दभूषण प्रेसची स्थापना करून बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राची सुरूवात झाली. ही साधीसुधी इमारत नसून आंबेडकरी चळवळीचे केंद्र होते.
यात कित्येक लोकांच्या भावना जुळल्या होत्या. त्यांचा विचार न करता रत्नाकर गायकवाड सारख्या आंबेडकर विरोधी माणसाने भाडोत्री गुंडाना घेऊन आंबेडकरी चळवळीचे केंद्रच उद्वस्त केले. देशाच्या घटनाकाराच्या कार्याचा गौरव करणे, सोडून केलेली ही कृती अपमानास्पद आहे. लांच्छनास्पद कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अन्यथा आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
उप विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना दिलवर रामटेके, दामू ड्रमाने, नंदकुमार खोब्रागडे, बादल राऊत, मनिषा शहारे, माधुरी जांभूळकर, रशिका साखरे, रक्षा शहारे, ज्ञानू प्रधान, गिरीश रंगारी, प्रियाशिल ताठोड, भाऊराव भोगाने, अक्षय वालदे व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)