तडीपार आरोपीचा बजरंगदल जिल्हा संयोजकांच्या घरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST2021-06-21T04:20:09+5:302021-06-21T04:20:09+5:30
प्राप्त माहितीनुसार आपल्याला तडीपार करण्यास बालाराम व्यास कारणीभूत आहे, असा राग मनात धरून आरोपी देवा बोकडे याने आरोपी सोनू ...

तडीपार आरोपीचा बजरंगदल जिल्हा संयोजकांच्या घरावर हल्ला
प्राप्त माहितीनुसार आपल्याला तडीपार करण्यास बालाराम व्यास कारणीभूत आहे, असा राग मनात धरून आरोपी देवा बोकडे याने आरोपी सोनू ताटी व डायना यांच्या सोबत व्यास यांच्या घराच्या लोखंडी गेटची कडी काढून आत प्रवेश केला. मुख्य दरवाजावर दगड मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असताना व्यास कुटुंबीय जागे झाले. बालाराम यांच्या आई-वडिलांनी दरवाजा रोखून धरला व वरच्या माळ्यावर झोपलेल्या मुलांना आवाज दिला. यात दार रोखून असलेल्या त्यांच्या आई निर्मला जखमी झाल्या. तर बालाराम व्यास येताच हल्लेखोर पळून गेले. तत्पूर्वी बालाराम यांनी हल्लेखोरांना ओळखले होते. पळताना हल्लेखोरांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. कुंभारटोली येथील अनेक गुन्ह्यात असलेला तडीपार गुंड देवा बोकडे, सोनू ताटी व डायना काही दिवसांपूर्वी फिरताना दिसून आले होते. बालाराम व्यास यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरूद्ध आमगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.