रस्त्यांचे बांधकाम क्षेत्राच्या समृद्धीचे प्रतिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:25 IST2018-03-30T22:25:25+5:302018-03-30T22:25:25+5:30

तालुक्यात आज राईस मिल उद्योग व शासकीय आयटीआय व पॉलीटेक्नीक सारख्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. या रस्त्यांमुळे लोकांना ये-जा करण्याची सोय होत असताना याच रस्त्यांनी समृद्धीही येत आहे.

The symbol of prosperity in the construction of roads | रस्त्यांचे बांधकाम क्षेत्राच्या समृद्धीचे प्रतिक

रस्त्यांचे बांधकाम क्षेत्राच्या समृद्धीचे प्रतिक

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : फुलचूर-तुमखेडा खुर्द रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : तालुक्यात आज राईस मिल उद्योग व शासकीय आयटीआय व पॉलीटेक्नीक सारख्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. या रस्त्यांमुळे लोकांना ये-जा करण्याची सोय होत असताना याच रस्त्यांनी समृद्धीही येत आहे. क्षेत्राचा चेहरा -मोहरा बदलण्यासाठी आम्ही इमानदारीने प्रयत्न केले असून त्याचे फलीत आहे की, क्षेत्रातील ग्रामीण भागांतही क्रांतीकारी परिवर्तन दिसून येत आहे. रस्त्यांचे बांधकामच तालुक्याच्या समृद्धीचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत २.१६ कोटींच्या निधीतून मंजूर तुमखेडा- फुलचूर, ग्राम तुमखेडा येथे ग्रामपंचायत ते गाव सिमा तसेच ग्राम फुलचूर येथे धर्मकाटा ते बायपास रस्त्यापर्यंत रस्ता सिमेंटीकरण व उरलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी, क्षेत्रातील विकास कामांसोबतच सुख-दुखाच्या प्रसंगीही नेहमी साथ देणारे लोकप्रतिनिधी आमदार अग्रवाल असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला, जि.प. सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, विठोबा लिल्हारे, स्नेहा गौतम, इंद्रायणी धावडे, ममता वाढवे, भास्कर रहांगडाले, रोहिणी रहांगडाले, संगीता जांभूळकर, दुर्गेश लिल्हारे, प्रल्हाद बनोटे, सुरेश मचाडे, गुन्नी पंधरे, सुनिता गराडे, लक्ष्मीकांता गराडे, शारदा लाडे, अनुसया वाडवे, भुमेश्वरी लिल्हारे, भय्यालाल मानकर, निलेश्वर कोरे, देवा मंडिया, प्रकाश मानकर, खेमराज नागपुरे, दुर्गाप्रसाद सारंगपुरे, शंकर गराडे, थानसिंग नागपुरे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.
४.७३ कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आज
तालुक्यातील ग्राम इर्री व कामठा येथे ४.७३ कोटींच्या निधीतून मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण शनिवारी (दि.३१) आमदार अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे. यात सायंकाळी ५ वाजता ग्राम इर्री येथे १५ लाख रूपयांच्या रस्ता सिमेंटीकरण व सायंकाळी ७ वाजता कामठा येथे १५ लाख रूपयांच्या रस्ता सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन तर १.५० कोटींच्या कामठा-मुडींपार रस्त्याचे लोकार्पण आमदार अग्रवाल करतील.

Web Title: The symbol of prosperity in the construction of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.