आत्मविश्वासाचे प्रतिक भगतसिंग
By Admin | Updated: October 2, 2016 01:31 IST2016-10-02T01:31:33+5:302016-10-02T01:31:33+5:30
इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र मिळावे यासाठी भगतसिंगानी जहाल कार्य केले.

आत्मविश्वासाचे प्रतिक भगतसिंग
आमगाव : इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र मिळावे यासाठी भगतसिंगानी जहाल कार्य केले. इंग्रज सरकारची रेल्वे लुटून इंग्रजांच्या नाकी नऊ आणले. देशासाठी बलीदान देतांना ते हसत-हसत फासावर चढले. त्यांच्याकडून आत्मविश्वास कसा असावा हे शिकण्यासारखे आहे, असे उद्गार मुख्याध्यापक शरद उपलपवार यांनी काढले.
आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथील यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पदमपूरच्या वरिष्ठ प्राथमिक शाळेत दि.२९ ला शहीद भगतसिंग यांच्या १०९ व्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य तथा शाळा समितीचे अध्यक्ष विजय ब्राम्हणकर, श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सहसचिव शंकर वारंगे, नरेश रहिले उपस्थित होते. शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी शंकर वारंग यांनी इंग्रजांच्या काळातील परिस्थिीती व शहीदांचे बलीदान यावर माहिती दिली. प्रास्ताविक नरेश रहिले यांनी तर संचालन अध्यक्ष आशिष तलमले तर आभार प्रेमानंद पाथोडे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी शैलेश लक्षणे, नरेश बोहरे, जितेंद्र फुंडे, अतूल फुंडे, हरिष भुते, दीपक भांडारकर, रविकांत पाऊलझगडे, प्रतिक करंडे, राहूल गायधने, झाकेश काटेखाये, दिनेश गिऱ्हेपुंजे, अश्वीन ब्राम्हणकर, पुरूषोत्तम थेर, विवेक थेर, राकेश हुकरे, महेंद्र गिऱ्हेपुंजे, सुनिल हुकरे, विनोद तावाडे, विरेंद्र ब्राम्हणकर, रामू फुंडे, शंकर कोरे, अवि मेंढे, रवी मेंढे, अजय बावने यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)