सासूसह पाच जणांवर जावयाचा तलवारहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 02:05 IST2016-03-30T02:05:08+5:302016-03-30T02:05:08+5:30

रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आंबेडकर वॉर्ड कुडवा येथील दोन भावंडांनी आपल्या सासूसह साळी, काकेसासू, साडभाऊ, ...

The Swordhalla on the five sides of Saktiyah | सासूसह पाच जणांवर जावयाचा तलवारहल्ला

सासूसह पाच जणांवर जावयाचा तलवारहल्ला

गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आंबेडकर वॉर्ड कुडवा येथील दोन भावंडांनी आपल्या सासूसह साळी, काकेसासू, साडभाऊ, साळी व साळीच्या मुलाला तलवारीने मारून जखमी केले. ही घटना सोमवारच्या सायंकाळी ७.३६ वाजतादरम्यान घडली.
पौर्णिमा अनमोल वंजारी (२४) रा. आंबेडकर वॉर्ड कुडवा यांनी रामनगर पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार आरोपी अनमोल योगराज वंजारी (२४) व भोजराज योगराज वंजारी (२६) या दोघांनी तलवारीने हल्ला केला. होळीनंतर सासरची मंडळी जावयाच्या घरी आली होती. आरोपी योगराजचा साळा प्रवीण मेश्राम त्याला रंग लावायला. अनमोल व भोजराज गेले असताना त्याने रंग लावू दिला नाही. या कारणावरून झालेल्या वादात दोन्ही भावंडांनी सासरच्या पाच लोकांना तलवारीने मारून जखमी केले.
सदर घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ३२३, ५०४,५०६ (ब), ३४ अन्वये सहकलम ४,२७ भारतीय हत्यार कायदा, सहकलम ३७ (१), (३), १३५ म.पो.कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: The Swordhalla on the five sides of Saktiyah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.