अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:27 IST2017-11-09T21:27:11+5:302017-11-09T21:27:22+5:30

येरंडी ग्रामपंचायतच्या मतदारयादीत असलेल्या घोळ प्रकरणात तक्रार करुनही सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांनी निर्णय न घेतल्यामुळे....

Suspended Tahasildar of Arjuni-Morgaon | अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार निलंबित

अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार निलंबित

ठळक मुद्देभंडारी नवे तहसीलदार : येरंडी ग्रा.पं. निवडणूक प्रकरण भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : येरंडी ग्रामपंचायतच्या मतदारयादीत असलेल्या घोळ प्रकरणात तक्रार करुनही सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांनी निर्णय न घेतल्यामुळे त्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी बुधवारी (दि.८) निलंबित केले आहे. तहसीलदारांचा कार्यभार गोंदियाचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सी.आर. भंडारी यांना सोपविण्यात आला असून ते गुरुवारी (दि.९) येथे रुजू झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ४० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार होत्या. यात येरंडीचा समावेश होता. निवडणुकीचा प्रस्तावित दिनांक १६ आॅक्टोबर होता. ७ फेबु्रवारी रोजी नमुना ६ मध्ये अर्ज सादर करुनही विशीष्ट दिनांकापर्यंत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाºयांकडून निर्णय न झाल्यामुळे १ जुलैच्या मतदारयादीमध्ये नावांचा समावेश करण्यात आला नाही. अशी तक्रार ८ सप्टेंबर रोजी ५९ लोकांनी केली होती. या कारणामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये येरंडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली होती. त्यामुळे १६ आॅक्टोबर रोजी येरंडी ग्रामपंचायतची निवडणूक होऊ शकली नाही. तालुक्यातील इतर ३९ ग्रा.पं.च्या निवडणूका पार पडल्या.
राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्रं.रानिआ/ग्रापनि-२०१७/ प्रक्र-१८/का-८ दि.६ नोव्हें.२०१७ नुसार परिच्छेद क्रं.१३ मध्ये नमूद केल्यानुसार तहसीलदार डी.सी. बांबोर्डे हे महाराष्टÑ नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील भाग-दोन (निलंबन) नियम ४ नुसार कार्यवाहीस पात्र ठरत असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करुन त्यांचे विरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्याबाबतचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.
या आदेशाचे पालन करीत महाराष्टÑ नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ४ च्या उपनियम (१) (क) अन्वये विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी बोम्बार्डे यांना शासन सेवेतून तात्काळ निलंबित केले आहे. निलंबन काळात त्यांना भंडारा मुख्यालय निश्चित करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.९) तहसीलदार पदाचा अतिरिक्त प्रभार गोंदियाचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारी यांनी घेतला आहे.

Web Title: Suspended Tahasildar of Arjuni-Morgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.