सूर्यवंशी हे आदर्श जिल्हाधिकारी

By Admin | Updated: October 3, 2016 01:43 IST2016-10-03T01:43:20+5:302016-10-03T01:43:20+5:30

जिल्हाधिकारी म्हणून काम करताना डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे. जिल्ह्यात सर्वांशी त्यांनी चांगले संबंध निर्माण केले.

Suryavanshi ideal Collector | सूर्यवंशी हे आदर्श जिल्हाधिकारी

सूर्यवंशी हे आदर्श जिल्हाधिकारी

गोपालदास अग्रवाल : जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप समारंभ
गोंदिया : जिल्हाधिकारी म्हणून काम करताना डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे. जिल्ह्यात सर्वांशी त्यांनी चांगले संबंध निर्माण केले. जिल्ह्यात सारस महोत्सव, कायापालट योजना यासह अनेक योजना त्यांनी प्रभावीपणे राबविल्या. त्यामुळे डॉ.सूर्यवंशी हे आदर्श जिल्हाधिकारी आहे, असे गौरवोद्गार राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी काढले.
गुरूवारी (दि.२९) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून दिल्ली येथे बदली झाल्यामुळे आयोजित निरोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते होते. प्रमुख पाहुणे म्हणून आरती सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.डी.शिंदे, उपविभागीय अधिकारी मोहन टोणगावकर, सुनिल सूर्यवंशी, जिल्हा खनीकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहाद्दूर तिडके प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, देशाच्या संरक्षण मंत्रालयाला देखील डॉ.सूर्यवंशी यांच्या सारख्या सनदी अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. गोंदिया शहराच्या स्वच्छतेत त्यांनी पुढाकार घेवून प्रत्यक्षात स्वच्छतेला सुरु वात केली. आपल्या 24 वर्षाच्या काळात डॉ.सूर्यवंशी यांच्यासारखे जिल्हाधिकारी जिल्ह्याला मिळाले नसल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना डॉ.सूर्यवंशी यांनी, आपल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात सर्वांकडून चांगले सहकार्य मिळाल्यामुळे आपण विविध उपक्र म यशस्वीपणे राबवू शकलो. जिल्ह्यात पर्यटन आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला भरपूर वाव आहे. लोकांना जेव्हा मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात तेव्हाच ते सोडविण्यासाठी आपल्याकडे येतात. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान झाले पाहिजे सांगीतले.
मोहिते यांनी, गोंदिया हा नक्षल जिल्हा असल्याची ओळख पुसून डॉ.सूर्यवंशी यांनी पर्यटनात जिल्ह्याची नवीन ओळख करु न दिली आहे. महाराजस्व अभियान, पर्यटन, महसूल वसूलीचे उद्दिष्ट पूर्ण करु न शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य माणसांचा लोकसेवक म्हणून डॉ.सूर्यवंशी यांनी काम केले असल्याचे मत व्यक्त केले. महिरे यांनी, कामानिमीत्त भेटीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस आस्थेवाईकपणे जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी करायचे. खऱ्या अर्थाने लोकसेवकाची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी पार पाडली आहे. प्रत्येक व्यक्तीला समजून घेवून त्यांच्या अडचणी देखील ते विचारत असायचे. विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ त्यांच्याच पुढाकारामुळे लाभार्थ्यांना वेळेत मिळाला असल्याचे सांगीतले.
कार्यक्र माला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, गोंदियाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी के.डी.मेश्राम, तहसिलदार सर्वश्री अरविंद हिंगे, विठ्ठल परळीकर, संजय नागिटळक, रविंद्र चव्हाण, साहेबराव राठोड, प्रशांत सांगडे, प्रशांत घोरु डे, सहायक अधीक्षक श्री.किरीमकर, सहायक लेखा अधिकारी कुलिदप गडलिंग, नियोजन अधिकारी श्री.कडू, लेखाधिकारी श्री.मसराम, नायब तहसिलदार विलास कोकवार, नाझर श्री.मेनन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, मंडळ अधिकारी श्री.कोल्हटकर, आकाश चव्हाण, श्री.झरारीया, श्री.राऊत यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माचे संचालन तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले. उपस्थितांचे आभार लेखाधिकारी श्री.बाविसकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Suryavanshi ideal Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.