सर्पमित्रांनी अजगराला दिले जीवदान
By Admin | Updated: July 11, 2016 01:43 IST2016-07-11T01:43:39+5:302016-07-11T01:43:39+5:30
आजही सापाला आपण वैरी समजतो. गावातील काही सुजान नागरिक सापाला मित्र समजणारेही समाजात वावरतात.

सर्पमित्रांनी अजगराला दिले जीवदान
बोंडगावदेवी : आजही सापाला आपण वैरी समजतो. गावातील काही सुजान नागरिक सापाला मित्र समजणारेही समाजात वावरतात. हनुमान शेंडे या सर्पमित्राने अजगर जातीच्या सापाला कोणतीही इजा न करता मोठ्या शिताफीने पकडला. साप पकडून ठेवल्याची बातमी कळताच अर्जुनी-मोरगावचे वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांनी साप ताब्यात घेऊन जंगलामध्ये सोडला.
कोरंभीटोला गावामध्ये एका सांधवाडीत भला मोठा अजगर साप आढळून आला. गावात भल्यामोठ्या सापाचे दर्शन झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले. गावातील सांधवाडीत अजगर साप असल्याची माहिती सर्पमित्र हनुमान शेंडे यांना कळताच ते गावात पोहचले. सापाचे दर्शन होताच हनुमान शेंडे यांनी मोठ्या शिताफीने कोणतीही ईजा न करता अजगर सापाला पकडून बंदिस्त केले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले आपल्या ताफ्यासह गावात पोहचले. पकडलेल्या अजगर सापाला वनविभागाने ताब्यात घेऊन मालकनपूरच्या जंगलात सोडून दिले. एका सर्पमित्राच्या सतर्कतेने अजगर सापाला जीवदान मिळाले. (वार्ताहर)