बधिरीकरण तज्ज्ञाअभावी अडत आहेत शस्त्रक्रिया
By Admin | Updated: January 12, 2015 22:51 IST2015-01-12T22:51:55+5:302015-01-12T22:51:55+5:30
गंगाबाई स्त्री रूग्णालयात दिवसाकाठी २० च्या घरात महिलांच्या प्रसुती होतात. त्यात सहा ते सात महिलांच्या शस्त्रक्रिया करून प्रसूती केल्या जातात. मात्र गंगाबाई स्त्री रूग्णालयात तीनपैकी

बधिरीकरण तज्ज्ञाअभावी अडत आहेत शस्त्रक्रिया
गोंदिया : गंगाबाई स्त्री रूग्णालयात दिवसाकाठी २० च्या घरात महिलांच्या प्रसुती होतात. त्यात सहा ते सात महिलांच्या शस्त्रक्रिया करून प्रसूती केल्या जातात. मात्र गंगाबाई स्त्री रूग्णालयात तीनपैकी एकच बधीरीकरण तज्ज्ञ असल्याने त्यांना २४ तास सेवा द्यावी लागत आहे. परिणामी एकाच व्यक्तीवर कामाचा भार येऊन त्यांच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात तीन बधीरीकरण तज्ज्ञांची पदे मंजूर आहेत. त्यातील फक्त एक डॉक्टर स्वेता वासनिक कार्यरत आहेत. दुसऱ्या बधीरीकरण तज्ज्ञ डॉ.सुप्रिया बोरकर प्रसूती रजेवर गेल्या आहेत. एनआरएचएम अंतर्गत डॉ.पूर्वी बाहेकर यांना घेण्यात आले. मात्र त्यांना केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. गंगाबाई स्त्री रूग्णालयात बधीरीकरण तज्ज्ञ नसल्यामुळे जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे मागणी करण्यात आली. ङॉ.गलाट यांना पाठविण्यात आले होते. परंतु त्या आल्या-आल्या त्या सुट्टीवर गेल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी )