वस्त्रदानातून असहाय महिलेला आधार

By Admin | Updated: December 2, 2015 02:05 IST2015-12-02T02:05:16+5:302015-12-02T02:05:16+5:30

माणसामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव असली तर तो कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असला तरी त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देत नाही.

Support for helpless women from clothes | वस्त्रदानातून असहाय महिलेला आधार

वस्त्रदानातून असहाय महिलेला आधार

सामाजिक उपक्रम : वैद्यकीय अधिकारी कुलसुंगे यांचा पुढाकार
बोंडगावदेवी : माणसामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव असली तर तो कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असला तरी त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देत नाही. आपली शासकीय सेवा ईमानेईतबारे करुन परिसरातील सामाजिक कार्यात सातत्याने पुढे राहणारे डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी आपल्या अंगातील सेवाभावी वृत्तीचा अनोखा देखावा निर्माण केला. गावातील एका विधवा महिलेला वस्त्रदान करुन समाजात नवा पायंडा घातला.
स्थानिक जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे मागील पाच-सहा वर्षापासून परिसरात आरोग्य सेवा देत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करण्याबरोबरच गावात नवीन शिबिर घेऊन गोरगरिबांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात. आपल्या आरोग्य विभागाच्या कार्यात तत्पर राहून गावात होणाऱ्या विविध सामाजिक कार्यातसुद्धा त्यांचा सहवास प्रकर्षाने जाणवतो. आपल्या उत्पन्नाचा थोडासा तरी समाजाला लाभ व्हावा या भावनेतून त्यांनी वस्त्रदान करण्याचा नवा उपक्रम सुरु केला.
ग्रामपंचायत कार्यालयात कुंदन कुलसुंगे यांच्यावतीने गावातील विधवा महिला निरु विजय वासनिक हिला साडी-चोळी भेट देण्यात आली. याप्रसंगी सरपंच राधेश्याम झोळे, ग्रा.पं.सदस्य दिनेश फुल्लूके, तंमुस अध्यक्ष तुळशीदास बोरकर, मु.धो. मानकर प्रमोद पाऊलझगडे, ग्रामसेवक एल.एन. ब्राह्मणकर, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच तंमुस पदाधिकारी उपस्थित होते. संचालन दिनेश फुल्लूके यांनी केले.(वार्ताहर)

Web Title: Support for helpless women from clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.