शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

गोंदिया जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटरमधे शिळ्या अन्नाचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 11:52 AM

तिरोडा तालुक्यातील ग्राम सरांडी येथील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना शिळ्या अन्नाचा पुरवठा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : २ दिवसांपूर्वीच गोंदिया-बालाघाट मार्गावरील जिनीयस लॉन येथील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर गुरूवारी (दि.६) तिरोडा तालुक्यातील ग्राम सरांडी येथील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना शिळ्या अन्नाचा पुरवठा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुन्हा क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बाहेरील जिल्हा व राज्यातून येणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. तिरोडा तालुक्यात ४ ठिकाणी क्वारंटाईन सेटर स्थापन करण्यात आले आहे. त्यापैकी सरांडी येथील शासकीय निवासी शाळेतील क्वारंटाईन सेटंरमधील नागरिकांना गुरूवारी सकाळी जेवणाचा पुरवठा करण्यात आला.

तेथील नागरिकांनी जेवणाचे पार्सल उघडले असता त्यांना चक्क शिळे अन्न देण्यात आल्याचे लक्षात आले. त्यानंतर सर्व नागरिकांनी जेवण न करताच ते पार्सल तसेच पॅक करुन ठेवले तसेच याची फोनवरुन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केली. पुरवठा करण्यात आलेल्या जेवणाच्या पार्सलचे फोटो काढून ते सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप केले.

या सर्व प्रकाराला घेवून क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. शिळे अन्न देऊन नागरिकांना आजारी पाडण्याचा हा प्रकार असून प्रशासनाने याची दखल घेवून जेवणाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली. येथील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना योग्य सोयी सुविधा पुरविल्या जात नसल्याची तक्रार केल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याची ओरड येथील नागरिकांची आहे. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिक सुरक्षित राहण्याऐवजी आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणामुळे बाहेरुन येणारे नागरिक क्वारंटाईन सेंटरमध्ये राहणे पसंत करीत नसून ते बाहेरुन आल्यानंतर याची माहिती प्रशासनाला न देता थेट घरी जात आहे. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेशसरांडी येथील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना शिळ्या जेवणाचा पुरवठा करण्यात आल्याची तक्रार येथील नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तसेच जेवणाच्या पार्सलचे फोटो काढून त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले. याचीच दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी तळपदे यांना क्वारंटाईन सेंटर येथे जावून चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.

२ दिवसांत दुसरे प्रकरणक्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. त्यात २ दिवसांपूर्वीच गोंदिया-बालाघाट मार्गावरील जिनीयस लॉन येथील क्वारंटाईन कक्षातील नागरिकांना दिलेल्या जेवणात अळ्या आणि खडे आढळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आज तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील क्वारंटाईन कक्षातील नागरिकांना शिळ्या अन्नाचा पुरवठा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे या कक्षाची जबाबदारी असलेले अधिकारी नेमके करतात तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस