पोषण आहारातील तांदळाचा पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:26 IST2019-02-14T21:25:41+5:302019-02-14T21:26:09+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शाळांमध्ये मागील काही दिवसांपासून तांदळाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळणे बंद झाले आहे.

पोषण आहारातील तांदळाचा पुरवठा करा
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शाळांमध्ये मागील काही दिवसांपासून तांदळाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळणे बंद झाले आहे.
शासनातर्फे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी इयता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण दिले जाते. शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी तांदूळ व इतर साहित्यांचा जि.प.अंतर्गत कंत्राटदाराच्या माध्यमातून पुरवठा केला जातो. मात्र शासनाकडून कंत्राटदारांना पोषण आहाराचा पुरवठा करण्याची संधी न मिळाल्याने त्यांनी पुरवठा थांबविल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली. परिणामी मागील ५ दिवसांपासून शालेय विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याचे चित्र आहे. शाळांनी तांदळाचा साठा संपला असल्याची माहिती शिक्षण विभागाला दिली. मात्र अद्यापही शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात आला नाही. यासंर्भात शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.