निंबा येथील व्यायामशाळेला साहित्य पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST2021-03-06T04:28:22+5:302021-03-06T04:28:22+5:30

सालेकसा : तालुक्यातील ग्राम निंबा येथील व्यायामशाळेकरिता इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या इमारतीत कोणतेही साहित्य पुरविण्यात न ...

Supply materials to the gym at Nimba | निंबा येथील व्यायामशाळेला साहित्य पुरवठा करा

निंबा येथील व्यायामशाळेला साहित्य पुरवठा करा

सालेकसा : तालुक्यातील ग्राम निंबा येथील व्यायामशाळेकरिता इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या इमारतीत कोणतेही साहित्य पुरविण्यात न आल्याने इमारत पांढरा हत्ती बनून उभी आहे. अशात निंबा येथील व्यायामशाळेला साहित्य पुरवठा करावा, अशी मागणी जितेंद्र बल्हारे यांनी केली आहे.

परिसरातील युवकांना व्यायामाकरिता कोणतेही साधन नसल्याने व्यायाम शाळेकरिता इमारत बांधकाम करण्यात आले आहे. मात्र व्यायामासाठी साहित्य पुरविण्यात आले नाही. अशात युवकांना व्यायामासाठी सोयच राहिली नाही. यावर परिसरातील युवकांनी बल्हारे यांच्याकडे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तसेच यासाठी आमदार सहसराम कोरोटे यांना निवेदन देण्यात आले. आमदार कोरोटे यांनी लवकरच साहित्य उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आहे. निवेदन देताना बल्हारे यांच्यासह खुशाल उपराडे, संदीप बिसेन, विनय ढेकवार, रवी कटरे, नितेश कटरे, महेंद्र गौतम, प्रवीण साखरे आदींसह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

Web Title: Supply materials to the gym at Nimba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.