पोलीस पाटलांतर्फे अधीक्षकांचे स्वागत

By Admin | Updated: May 28, 2016 01:54 IST2016-05-28T01:54:58+5:302016-05-28T01:54:58+5:30

गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांची भेट घेवून

Superintendents of Police Patels welcome | पोलीस पाटलांतर्फे अधीक्षकांचे स्वागत

पोलीस पाटलांतर्फे अधीक्षकांचे स्वागत

गोंदिया : गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांची भेट घेवून त्यांचे संघटनेच्या वतीने स्वागत केले. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील व पोलीस मित्रांची प्रत्येक उपविभागीय स्तरावर कार्यशाळा घेण्यात येईल, असे सांगितले. भूजबळ म्हणाले, पोलीस पाटील पोलीस प्रशासनाचा गाव पातळीवरील प्रमुख आहे. त्यांना अधिकाधिक प्रशासनाभिमुख करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. परंतु तपासकामी लोकसहभागसुद्धा आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस मित्र ही संकल्पना पुढे आली असून त्यांनासुद्धा आपण सोबत प्रशिक्षण देवू. तंटामुक्त समित्यांनी वेळोवेळी सभा घेऊन गाव पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटवून सहकार्य करावे. या वेळी पोलीस पाटलांच्या मागणीनुसार, प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये पोलीस पाटलांची मासिक सभा आयोजित करावी व अशा सभांना सतत गैरहजर राहणाऱ्या पोलीस पाटलांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. तसेच महिन्याचे मानधन पोलीस ठाण्यामधूनच देणे पोलीस पाटलांच्या सोईचे असल्याचे म्हणाले. याप्रसंगी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था लोकसहकार्यातून कशी सुदृढ करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. सदर प्रस्तावित कार्यशाळा प्रत्येक उपविभागीय स्तरावर आयोजित करणे सोईचे होईल, असे सहायक पोलीस अधीक्षक संदीप पखाले म्हणाले. यानंतर भृंगराज परशुरामकर यांनी संकलित केलेली पोलीस पाटील मार्गदर्शिका भेट दिली. चर्चेप्रसंगी परशुरामकर यांच्यासह संघटनेचे कोषाध्यक्ष दिलीप मेश्राम, उपाध्यक्ष मोहनसिंह बघेल, आनंद तुरकर, श्रीराम झिंगरे, प्रकाश कठाणे व कुंजीलाल भगत उपस्थित होते.

Web Title: Superintendents of Police Patels welcome